भामरागडात लिंबाएवढ्या गारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:07 IST2018-04-01T00:07:59+5:302018-04-01T00:07:59+5:30
भामरागड शहरासह तालुक्याच्या काही भागात शनिवारी सायंकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास वादळवाऱ्यासह पाऊस बरसला. दरम्यान गारपीट झाल्याने अनेकांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले.

भामरागडात लिंबाएवढ्या गारा
ठळक मुद्देवीजपुरवठा खंडित : मोठे नुकसान झाल्याचा अंदाज
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : भामरागड शहरासह तालुक्याच्या काही भागात शनिवारी सायंकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास वादळवाऱ्यासह पाऊस बरसला. दरम्यान गारपीट झाल्याने अनेकांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले.
गेल्या चार-पाच दिवसांपासून तापमान वाढले असल्याने उकाडा निर्माण झाला आहे. मात्र शनिवारी सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरण बदल होऊन मेघगर्जनेसह पाऊस बरसला. वादळामुळे भामरागड शहरासह तालुक्याच्या काही भागातील वीज पुरवठा खंडीत झाला. सदर गारपीट व पावसाचा काही नागरिकांना फटका बसला. लोकांची तारांबळही उडाली. गडचिरोली शहरात सायंकाळच्या सुमारास रिमझिम पाऊस बरसला. वातावरणात गारवा होता.