भामरागड नगर पंचायतीत ३,३२४ मतदार

By Admin | Updated: October 8, 2015 01:01 IST2015-10-08T01:01:38+5:302015-10-08T01:01:38+5:30

राज्यपालांनी दत्तक घेतलेला तालुका मुख्यालय असलेले भामरागडची नगर पंचायत केवळ ३ हजार ३२४ मतदारांची राहणार आहे.

Bhamragad Nagar Panchayat 3,324 voters | भामरागड नगर पंचायतीत ३,३२४ मतदार

भामरागड नगर पंचायतीत ३,३२४ मतदार

१७ वॉर्ड राहणार : नऊ जागा महिलांसाठी झाल्या राखीव; हेमलकसा, बेजूर, ताडगावचाही समावेश
रमेश मारगोनवार भामरागड
राज्यपालांनी दत्तक घेतलेला तालुका मुख्यालय असलेले भामरागडची नगर पंचायत केवळ ३ हजार ३२४ मतदारांची राहणार आहे. भामरागडलगतच्या हेमलकसा, मेडपल्ली, हिनभट्टी, दुब्बागुडा, लोकबिरादरी, कोयनगुडा, ताडगाव, बेजूर या गावांचाही समावेश भामरागड नगर पंचायतीत करण्यात आला आहे.
१७ प्रभागातील ९ जागा या महिलांसाठी राखीव राहणार आहे. अनुसूचित जमाती स्त्रीसाठी ६ जागा तर नामाप्र स्त्रीसाठी ३ जागा राखीव करण्यात आल्या आहे. याशिवाय अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ५, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १ जागा राखीव राहणार आहे. प्रशासनाने एकूण १७ मतदान केंद्र निर्माण केले आहे. यामध्ये जिल्हा परिषद शाळा हेमलकसा येथे ४ मतदान केंद्र राहणार आहे. जिल्हा परिषद शाळा हेमलकसा येथे ४ मतदान केंद्र राहणार आहे. समूह निवासी शाळा भामरागड येथे ८ मतदान केंद्र राहणार आहे. याशिवाय पं. स. कार्यालयाचा मिटिंग हॉल येथेही मतदान केंद्र निर्माण करण्यात आला आहे. जिल्हा परिषद ताडगाव येथे २ मतदान केंद्र तर शासकीय माध्यमिक आश्रमशाळा ताडगाव येथे २ मतदान केंद्र राहणार आहे. भामरागडचे ४ मतदान केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आले.
२० किमीच्या परिघात राहणार भामरागड नगर पंचायतीचे क्षेत्र
भामरागड नगर पंचायतीचे क्षेत्र परिसरातील गावांमध्येही पसरविण्यात आल्याने जवळजवळ २० किमीचा परीघ या क्षेत्रात येणार आहे. १७ वॉर्ड तयार करताना परिसरातील गावांनाही यात समाविष्ट करण्यात आले आहे. प्रभाग क्र. १ मध्ये जि. प. प्राथमिक शाळा परिसर हेमलकसा, प्रभाग क्र. २ गोटूल परिसर हेमलकसा, प्रभाग क्र. ३ भगवंतराव माध्यमिक शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय परिसर, प्रभाग क्र. ४ नवीन इमारत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, प्रभाग क्र. ५ कालिमाता मंदिर परिसर, प्रभाग क्र. ६ तहसील कार्यालय परिसर, प्रभाग क्र. ७ पंचायत समिती पाण्याची टाकी व पोलीस ठाणे परिसर, प्रभाग क्र. ८ मेडपल्ली, हिनभट्टी, दुब्बागुडा वॉर्ड, प्रभाग क्र. ९ डॉ. आंबेडकर वॉर्ड, प्रभाग १० बाजारवाडी परिसर, प्रभाग ११ मध्ये मुस्लिम वॉर्ड, प्रभाग क्र. १२ मध्ये लोकबिरादरी व हेमलकसा टोला, प्रभाग १३ लोकबिरादरी व कोयनगुडा, प्रभाग १४ बेजुर व ताडगाव परिसर, प्रभाग १५ मध्ये समाज मंदिर ताडगाव, प्रभाग १६ मध्ये शासकीय आश्रमशाळा, प्रभाग १७ मध्ये कालिमाता मंदिर परिसर ताडगावचा समावेश आहे.

Web Title: Bhamragad Nagar Panchayat 3,324 voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.