भाग्यलक्ष्मी दुंडूवार यांना अटक
By Admin | Updated: September 8, 2016 01:28 IST2016-09-08T01:28:22+5:302016-09-08T01:28:22+5:30
आष्टी येथील गुरू साई टेक्निकल कॉलेजमध्ये शिष्यवृत्ती वाटपात २ कोटी ४३ लाख रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी

भाग्यलक्ष्मी दुंडूवार यांना अटक
शिष्यवृत्ती घोटाळा : तीन दिवसांची पोलीस कोठडी
गडचिरोली : आष्टी येथील गुरू साई टेक्निकल कॉलेजमध्ये शिष्यवृत्ती वाटपात २ कोटी ४३ लाख रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी मागील तीन ते चार महिन्यांपासून फरार असलेल्या संचालक मंडळाच्या सदस्य भाग्यलक्ष्मी दुंडूवार यांना बुधवार ७ सप्टेंबर रोजी चंद्रपूर येथील त्यांच्या राहत्या घरून पोलिसांनी अटक केली. भाग्यलक्ष्मी दुंडूवार यांना बुधवारी गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, त्यांना ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. भाग्यलक्ष्मी दुंडूवार यांच्यावर २ कोटी ४३ लाख रूपयांच्या शिष्यवृत्ती अपहाराचा आरोप होता. मागील तीन ते चार महिन्यांपासून त्या फरार होत्या. दुंडूवार चंद्रपूर येथील घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांच्या विशेष पथकाने चंद्रपूर गोठून त्यांना अटक केली. शिष्यवृत्ती अपहार प्रकरणी यापूर्वी जिल्हा सत्र न्यायालय व नागपूर खंडपीठाने त्यांचा जामीन फेटाळून लावला होता. तेव्हापासून त्या फरार होत्या. (प्रतिनिधी)