बनावट खते, बियाणे विकाल तर खबरदार; 39 दुकानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 05:00 IST2021-12-15T05:00:00+5:302021-12-15T05:00:34+5:30
बहुतांश शेतकरी अशिक्षित व साधेभाेळे राहतात. याचा गैरफायदा दुकानदारांकडून घेतला जाते. कधी-कधी बाेगस खते, बियाणे, कीटकनाशके विकली जातात तर कधी-कधी अधिक दराने या सर्व वस्तूंची विक्री हाेते. या बाबींवर नियंत्रण राहावे, यासाठी कृषी विभागामार्फत वेळाेवेळी तपासण्या केल्या जातात. गडचिराेली जिल्ह्यात तपासणीसाठी प्रत्येक तालुकास्तरावर एकतर जिल्हास्तरावर एक असे एकूण १३ पथके आहेत.

बनावट खते, बियाणे विकाल तर खबरदार; 39 दुकानांवर कारवाई
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : खते, बियाणे, कीटकनाशके विकताना शेतकऱ्यांची फसवणूक हाेऊ नये, यासाठी कृषी विभागामार्फत दुकानांची वेळाेवेळी तपासणी केली जाते. यावर्षीच्या आर्थिक वर्षात जिल्हाभरातील २ हजार ३३ तपासण्या करून ९२२ नमुने घेण्यात आले. त्यात ३९ दुकानदारांचे नमुने अप्रमाणित निघाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
बहुतांश शेतकरी अशिक्षित व साधेभाेळे राहतात. याचा गैरफायदा दुकानदारांकडून घेतला जाते. कधी-कधी बाेगस खते, बियाणे, कीटकनाशके विकली जातात तर कधी-कधी अधिक दराने या सर्व वस्तूंची विक्री हाेते. या बाबींवर नियंत्रण राहावे, यासाठी कृषी विभागामार्फत वेळाेवेळी तपासण्या केल्या जातात. गडचिराेली जिल्ह्यात तपासणीसाठी प्रत्येक तालुकास्तरावर एकतर जिल्हास्तरावर एक असे एकूण १३ पथके आहेत. शेतकऱ्यांकडून तक्रार प्राप्त हाेताच संबंधित दुकानांची तपासणी केली जाते.
२२ जणांवर खटले दाखल
५ बियाणे विक्रेते, १३ खत विक्रेते व ४ कीटकनाशके विक्रेत्यांवर कृषी विभागाने न्यायालयात खटले दाखल केले आहेत तसेच १७ बियाणे विक्रेते, १८ खत विक्रेते व ४ कीटकनाशके विक्रेत्यांना ताकीद देण्यात आली आहे. नाेटीस नंतरही सुधारणा न झाल्यास संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द हाेते.
एका दुकानाचा परवाना केला निलंबित
- कृषी विभागाने केलेल्या पाहणीत एका दुकानदाराच्या दुकानातील खत अप्रमाणित असल्याचे आढळून आले. संबंधित दुकानदाराचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
- कृषी विभाग वेळाेवेळी तपासण्या करीत असल्याने दुकानदार बाेगस बियाणे किंवा खते विकत नाही. मात्र शेतकऱ्यांकडून अधिकचे पैसे वसूल करतात. बियाण्यांच्या कंपन्यांनी जेवढी किंमत छापली आहे, त्यापेक्षा अधिक किमतीने बियाण्यांची विक्री करू नये, असा नियम आहे. मात्र कंपन्या दुकानदारांना जवळपास ५० टक्के मार्जिन देऊन किंमत लिहीतात. त्यामुळे बियाण्यांच्या किमतीत दुकाननिहाय फरक दिसून येते.
१३ लाखांचे बियाणे जप्त
अहेरी तालुक्यातील शेतकऱ्यांना कापसाचे बाेगस बियाणे पुरविले जात असल्याची गाेपनीय माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. अधिकाऱ्यांनी दाेन ठिकाणी धाड टाकून बियाणे जप्त केले. मागील सहा महिन्यांच्या कालावधीत १३ लाख ५८ हजार रुपयांचे बियाणे जप्त करण्यात आले. महाराष्ट्रात काही कापुस बियाण्यांना प्रतिबंध घातला आहे, असे बियाणे विकल्या जातात.