सावधान, फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली हाेऊ शकते फसवणूक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:37 IST2021-09-19T04:37:40+5:302021-09-19T04:37:40+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : पाेळ्याच्या सणानंतर आता गणेशाेत्सवही शेवटच्या टप्प्यात आहे. आता नवरात्र, दसरा, दिवाळी, आदी माेठे ...

सावधान, फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली हाेऊ शकते फसवणूक !
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : पाेळ्याच्या सणानंतर आता गणेशाेत्सवही शेवटच्या टप्प्यात आहे. आता नवरात्र, दसरा, दिवाळी, आदी माेठे सण येत आहेत. त्यामुळे विविध कंपन्यांकडून ऑनलाइन फेस्टिव्हल ऑफर सुरू हाेणार आहेत. त्यातून काही बनावट वेबसाईट व लिंकच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक हाेण्याची शक्यता आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून फसवणूक झाल्याच्या तक्रारी सायबर सेलकडे यापूर्वी प्राप्त झाल्या आहेत. मात्र, त्या अल्प असल्या तरी योग्य खबरदारी न घेतल्यास पुढील काळात अनेकजण यात फसण्याची शक्यता आहे.
फेस्टिव्हलच्या नावाखाली विविध वेबसाईट, तसेच साेशल मीडियावर जाहिराती सुरू झाल्या आहेत. ॲप व लिंकद्वारे विविध प्रकारचे ऑफर येऊ लागले आहेत. मात्र, त्या बनावट असू शकतात. फेस्टिव्हल ऑफरच्या नावाखाली फसवणूक हाेऊ नये, यासाठी नागरिकांनी सावधान राहावे, असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.
बाॅक्स...
अशी हाेऊ शकते फसवणूक
- फेसबुक, ट्विटर अकाऊन्ट, व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून संसारासाठी लागणाऱ्या वस्तूंपासून ते इलेक्ट्राॅनिक्स वस्तूंच्या जाहिराती लाेकांपर्यंत पाेहाेचतात. ऑनलाईन वेतनाद्वारे पैसे भरून वस्तू १० ते ४० टक्के सुटीवर मिळण्याची ऑफर दिली जात आहे. तसेच संबंधित वस्तू एवढ्या सुटीवर घरपाेच मिळतील, अशीही ऑफर दिली जाते. याला बळी पडून अनेकजण ऑनलाईन पैसे भरतात; मात्र वस्तू मिळत नाही.
- विविध नामांकित कंपन्यांची ग्राहकांची छाप असते. अशा कंपन्यांचा लाेगाे व नाव वापरून लिंक तयार केली जाते. ही लिंक फेसबुक व व्हाॅट्सॲपवर पाठविली जाते. फेस्टिव्हल ऑफरच्या नावाखाली माेठ्या प्रमाणावर सूट असल्याचे सांगितले जाते. परंतु, लिंक बनावट असते. पैसे भरूनही वस्तू मिळत नाही. संबंधित कंपनी व वेबसाईटचा पत्ता लागत नाही.
बाॅक्स...
भीतीपाेटी अनेकजण तक्रारी करीत नाही
- ऑनलाइन पद्धतीने आर्थिक फसवणूक झाल्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहेत. याबाबतच्या सात ते आठ तक्रारी गेल्या दीड वर्षात सायबर सेल विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. अनेकजण भीतीपाेटी किंवा इतर कारणांनी सायबर विभागाकडे तक्रारी दाखल करीत नाही. जागृती हाेऊनही अनेकजण बळी पडतात.
बाॅक्स...
ही घ्या काळजी
- काेणतीही कंपनी २० ते २५ टक्क्यांपेक्षा अधिक सूट अथवा सवलतीची ऑफर देत नाही. त्यामुळे ३० ते ३५ टक्के फेस्टिव्हल ऑफर राहूच शकत नाही. त्यामुळे अशा ऑफरला बळी पडू नये.
- कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरच वस्तूंची मागणी नाेंदवावी. ऑनलाईन पेमेंट करताना सर्व बाबींची पडताळणी करावी, असे आवाहन सायबर पाेलीस सेलच्या वतीने करण्यात आली आहे.