वंशाच्या दिव्यापुढे ‘बेटी बचाव’ हरली; मुलींचा जन्मदर घटला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:41 IST2021-09-21T04:41:02+5:302021-09-21T04:41:02+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : दर हजारी मुलांमागे मुलींचे प्रमाण वाढावे, यासाठी आराेग्य विभाग सातत्याने जनजागृतीच्या माध्यमातून प्रयत्न करीत ...

वंशाच्या दिव्यापुढे ‘बेटी बचाव’ हरली; मुलींचा जन्मदर घटला!
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : दर हजारी मुलांमागे मुलींचे प्रमाण वाढावे, यासाठी आराेग्य विभाग सातत्याने जनजागृतीच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. मात्र अजूनही गडचिराेली जिल्ह्यात मुलींपेक्षा मुलांच्याच जन्माचे प्रमाण अधिक आहे. मुलींचा दर घटला आहे.
आराेग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, सन २०१६-१७ ते २०२०-२१ या कालावधीत मुलींपेक्षा मुले संख्येने ५०० ते ५५० अधिक जन्मली आहेत. याला चालू वर्षात अपवाद आहे. सन २०२१-२२ या चालू वर्षात यापेक्षा उलट स्थिती आहे. सप्टेंबर २०२१ पर्यंत मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण अधिक आहे. आतापर्यंत मुलांपेक्षा १५६ मुली अधिक जन्मल्या आहेत. ही जिल्ह्यासाठी चांगली बाब आहे.
बाॅक्स...
दरवर्षी ५०० वर मुले अधिक
n अनेक जाेडप्यांमध्ये मुला, मुलींमध्ये गैरसमज आहे. प्रशासनाच्या वतीने जनजागृती हाेत असली तरी मुलींचा जन्मदर पाहिजे त्या प्रमाणात वाढला नाही. सन २०१६-१७ ते २०१९-२० पर्यंत मुलांच्याच जन्माचे प्रमाण अधिक आहे. २०१७ मध्ये मुलींपेक्षा ८३९ मुले अधिक जन्मली. वर्ष २०१८ मध्ये ५६८, वर्ष २०१९ मध्ये ६७०, वर्ष २०२० मध्ये ५८० मुले मुलींच्या तुलनेत अधिक जन्मली आहेत. चालू वर्षात २०२१ मध्ये ३,३०६ मुले व ३,१५० मुली जन्मल्या.
बाॅक्स...
लिंगनिदानास बंदी
स्त्रीभ्रूणहत्या राेखण्यासाठी प्रसूतीपूर्व निदानतंत्र कायदा १९९४ लागू करण्यात आला आहे. या कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.
काेट...
प्रसूतीपूर्वी लिंगनिदान करणे हा कायद्याने गुन्हा आहे. दर हजारी मुलांमागे मुलींचे प्रमाण वाढावे, हा प्रशासनासह शासनाचा हेतू आहे. मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढण्यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या कार्यक्रमातून जिल्ह्यात जनजागृती केली जाते. पाच ते सहा वर्षांच्या तुलनेत आता मुलींचे दर वाढले आहे.
- डाॅ. समीर बन्साेडे, जिल्हा माता, बालसंगाेपन अधिकारी, जि. प. गडचिराेली