उत्कृष्ट आशा स्वयंसेविकांचा गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:35 IST2021-01-13T05:35:07+5:302021-01-13T05:35:07+5:30

देसाईगंज : ग्रामीण भागात आराेग्य सेवेचे उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांचा सत्कार तालुका आराेग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आला. ...

The best hope is the lack of volunteers | उत्कृष्ट आशा स्वयंसेविकांचा गाैरव

उत्कृष्ट आशा स्वयंसेविकांचा गाैरव

देसाईगंज : ग्रामीण भागात आराेग्य सेवेचे उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांचा सत्कार तालुका आराेग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन सावंगीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक गहाणे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. अभिषेक कुंभरे हाेते. यावेळी कुरुडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पी.जी. सडमेक, जिल्हा समूह संघटक धीरज सेलोटे, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार विशाखा काटवले उपस्थित होते. याप्रसंगी सर्व आशा स्वयंसेविकांची कोविड चाचणी, हिमोग्लोबीन,रक्तदाब, मधुमेह, सिकलसेल तपासणी करण्यात आली. तसेच आशांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात सहभागी झालेल्यांना प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. संचालन तालुका समूह संघटक कविता आठवले, प्रास्ताविक बबिता आढाऊ तर आभार तालुका लेखापाल चंद्रकांत मेश्राम यांनी मानले.

Web Title: The best hope is the lack of volunteers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.