जीवनदायी आरोग्य योजनेतून ३ हजार ७४० रूग्णांना लाभ
By Admin | Updated: August 7, 2016 01:37 IST2016-08-07T01:37:31+5:302016-08-07T01:37:31+5:30
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत सन २०१२ पासून आतापर्यंत एकूण ३ हजार ७४० रूग्णांना लाभ देण्यात आला आहे.

जीवनदायी आरोग्य योजनेतून ३ हजार ७४० रूग्णांना लाभ
गडचिरोली : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत सन २०१२ पासून आतापर्यंत एकूण ३ हजार ७४० रूग्णांना लाभ देण्यात आला आहे.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची अंमलबजावणी २ जुलै २०१२ पासून प्रथम टप्प्यात सुरू झाली. सध्या या योजनेचा लाभ पिवळा, केशरी, अंत्योदय व अन्नपूर्णा तसेच शासकीय ओळखपत्र असणाऱ्यांना दिला जातो. या लाभार्थ्यांच्या प्रत्येक कुटुंबास मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी २ लाख ५० हजार रूपयाचा विमा संरक्षण देय आहे. या योजनेंतर्गत विविध प्रकारच्या आजाराने ग्रस्त असलेल्या ९७२ रूग्णांवर शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येते. या योजनेत १२१ उपचार पध्दतीचा समावेश करण्यात आला असून शासकीय रूग्णालयामध्ये १३१ उपचार पध्दतीचा समावेश करण्यात आला आहे. निवड आजारासाठी मोफत आरोग्य सेवेची तरतूद असून रूग्णाने उपचाराकरिता प्रवेश मिळण्यापासून सर्व परीक्षण, शस्त्रक्रिया तसेच रूग्णालयातून बाहेर पडेपर्यंत नि:शुल्क सुविधा आहेत.