मधमाश्यांचे पोळ बनला कुतूहलाचा विषय

By Admin | Updated: October 4, 2014 23:26 IST2014-10-04T23:26:25+5:302014-10-04T23:26:25+5:30

येथील आदर्शधाममध्ये गेल्या ३२ वर्षांपासून सतत स्थापित होणाऱ्या आदर्श दुर्गोत्सवाच्या मंडळाच्या कळसावर मधमाश्यांचे पोळ तयार झाले आहे. सदर मधमाश्यांचे पोळ अहेरीकरांसाठी सध्या कुतूहलाचा

Bees became a hive, subject to curiosity | मधमाश्यांचे पोळ बनला कुतूहलाचा विषय

मधमाश्यांचे पोळ बनला कुतूहलाचा विषय

अहेरी : येथील आदर्शधाममध्ये गेल्या ३२ वर्षांपासून सतत स्थापित होणाऱ्या आदर्श दुर्गोत्सवाच्या मंडळाच्या कळसावर मधमाश्यांचे पोळ तयार झाले आहे. सदर मधमाश्यांचे पोळ अहेरीकरांसाठी सध्या कुतूहलाचा विषय बनला असून हे पाहण्यासाठी लोकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे.
अहेरी येथे आदर्श दुर्गोत्सव मंडळातर्फे नियमित सुरू असलेले दुर्गा मातेची पूजा व नवरात्रोत्सवातील कामाचे आयोजन यांचा प्रत्येकांमध्ये आकर्षण आहे. गरबा नृत्य, भजन आरती तसेच विविध सामाजिक कार्यक्रमासाठी लोक हजारोच्या संख्येने या मंडपाच्यास्थळी उपस्थित होत आहे. मात्र यंदा मंडपाच्या कळसावर मध्यमाशांचा पोळा शहरवासीयांसाठी नवलाचा विषय बनला आहे. साधारणत: कोणत्याही प्रकारचा धुव्वा केल्याने मधमाश्यांच्या पोळ्यांमधून मधमाशी निघून जातात. मात्र येथे आरतीच्यावेळी होणारा धुपांच्या धुव्व्यामध्ये मधमाश्यांचा पोळा बनण्यास सुरूवात झाली. दिवसेंदिवस हा मधमाश्यांचा पोळा आणखी वाढतच आहे.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Bees became a hive, subject to curiosity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.