प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोरेतोगू पुलाची उंची ‘जैसे थे’

By Admin | Updated: May 15, 2015 01:35 IST2015-05-15T01:35:27+5:302015-05-15T01:35:27+5:30

सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर- रोमपल्ली मार्गावरील कोरेतोगू कमी उंचीच्या पुलामुळे पावसाळ्यात परिसरातील ...

Because of the lack of administration, the height of Koreatogu bridge was like ' | प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोरेतोगू पुलाची उंची ‘जैसे थे’

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोरेतोगू पुलाची उंची ‘जैसे थे’

जनजीवन होते ठप्प : १५ फूट उंची वाढविण्याची नागरिकांची मागणी
झिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर- रोमपल्ली मार्गावरील कोरेतोगू कमी उंचीच्या पुलामुळे पावसाळ्यात परिसरातील ३० गावातील लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. सदर पुलाची उंची वाढविण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार करण्यात आली होती. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
झिंगानूरपासून १२ किमी व सिरकोंडापासून पाच किमी अंतरावर असलेल्या कोरेतोगू कमी उंचीच्या पुलामुळे पावसाळ्यात छोटीसी सर आली तरीसुद्धा येथील वाहतूक बंद पडते. जवळपास १२ ते १५ फुट पाणी पुलावरून पावसाळ्यात अनेकदा वाहते. सदर मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहतुकीसही अडथळा होत आहे. उन्हाळा संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र यंदाही सदर पुलाच्या नवनिर्माणाचे काम प्रशासनाच्या वतीने अद्यापही हाती घेण्यात आले नाही. परिणामी या पावसाळ्यात यंदाही नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
३० गावातील लोकांना होतो पावसाळ्यात त्रास
सिरोंचा तालुक्यातील कोरेतोगु पुलाची उंची अतिशय कमी असल्याने पावसाळ्यात या पुलावरून अनेकदा पाणी वाहते. परिणामी परिसरातील २५ ते ३० गावातील या मार्गाने होणारी वाहतूक ठप्प होते. पूर आल्यानंतर अनेकदा चार ते पाच दिवस मार्ग बंद असतो. पावसाची रिपरिप सुरू असली तर जवळपास आठ दिवसांपर्यंत पूर ओसरत नाही. परिणामी या परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. या कालावधीत दळणवळणाची साधनेही बंद स्थितीत असतात. महत्त्वाचे काम वेळीच होऊ शकत नाही.

Web Title: Because of the lack of administration, the height of Koreatogu bridge was like '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.