जाहिरातीच्या अनधिकृत हाेर्डिंग्जमुळे हरपले गडचिराेली शहराचे साैंदर्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:28 IST2021-01-10T04:28:23+5:302021-01-10T04:28:23+5:30
राजकीय पक्षांचे विविध मेळावे, कार्यक्रम, अभिनंदनाच्या जाहिराती करण्यासाठी बॅनर्स तयार केले जातात. शिवाय काही व्यावसायिक जाहिरातीचेेही बॅनर लावले जाते. ...

जाहिरातीच्या अनधिकृत हाेर्डिंग्जमुळे हरपले गडचिराेली शहराचे साैंदर्य
राजकीय पक्षांचे विविध मेळावे, कार्यक्रम, अभिनंदनाच्या जाहिराती करण्यासाठी बॅनर्स तयार केले जातात. शिवाय काही व्यावसायिक जाहिरातीचेेही बॅनर लावले जाते. शहरात इंदिरा गांधी चाैकासह चारही मुख्य मार्गावर तसेच दर्शनी भागावर विविध प्रकारचे बॅनर लाेक लावतात.
१० बाय १० आकाराच्या हाेर्डिंग्जसाठी वार्षिक सात हजार रुपये, १० बाय २० च्या हाेर्डिंग्जसाठी वार्षिक १० हजार, २० बाॅय ४० आकाराच्या हाेर्डिंग्जसाठी वार्षिक १४ हजार रुपयाचे शुल्क न.प. प्रशासन आकारत असते. नियमित कठीण हाेर्डिंग्जसाठी प्रति दिवस प्रति स्क्वे.फूट ७५ पैसे असा दर आकारला जाताे. १० बाय १० आकाराच्या बॅनरसाठी एका दिवसाला ७५ रुपये माेजावे लागतात. मात्र काही जण न.प.ची एनओसी घेत नाही.
बाॅक्स...
परवाना न घेताच लागतात होर्डिंग्ज
शहरात व न.प.च्या हद्दीत जाहिराती करण्याबाबतचे हाेर्डिंग्ज लावण्याकरिता शुल्काची रक्कम भरणाऱ्यांना रीतसर परवाना दिला जाताे. लावण्यात येणाऱ्या हाेर्डिंग्जवर एका काेपऱ्यात न.प.चा परवाना क्रमांक नमूद असतो. ज्या हाेर्डिंग्जवर अशा प्रकारचा परवाना क्रमांक नमूद नाही, ताे बॅनर अनधिकृत असताे. शहरातील बहुतांश बॅनर अनधिकृत आहेत. अशा प्रकारचे बॅनर लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. बॅनर लावणाऱ्यांनी काेपऱ्यात परवाना क्रमांक आवर्जून नमूद करावा, असे आवाहन न.प.ने केले आहे.
बाॅक्स....
होर्डिंग्जमधून पालिकेला २.४० लाख उत्पन्न
गडचिराेली न.प.प्रशासनाला अधिकृत हाेर्डिंग्ज व बॅनरच्या माध्यमातून दरवर्षी अडीच लाखापेक्षा अधिक उत्पन्न मिळत हाेते. सन २०२०-२१ या चालू वर्षात आतापर्यंत न.पं. प्रशासनाला हाेर्डिंग्ज एनओेसीच्या माध्यमातून २ लाख ४० हजार रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत हे उत्पन्न साडेतीन लाखाच्या आसपास पाेहाेचणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
काेट...
आकारानुसार व कालावधीनुसार लावण्यात येणाऱ्या हाेर्डिंग्ज व बॅनरसाठी न.प. प्रशासनाच्या वतीने संबंधितावर कराची आकारणी केली जाते. वार्षिक व प्रति दिवसानुसार हाेर्डिंग्ज लावण्याचे वेगवेगळे दर आहेत. २०१९ च्या लाेकसभा निवडणुकीदरम्यान अनधिकृत हाेर्डिंग्ज लावणाऱ्या एका राजकीय पक्षाच्या उमदेवारावर ५९ हजार ३०० रुपये इतक्या रुपयाच्या दंडात्मक कारवाई केली हाेती. कुणी तक्रार केल्यास व तसे निदर्शनास आणून दिल्यास कारवाई नक्की करू.
- रवींद्र भंडारवार, उपमुख्याधिकारी, न.प. गडचिराेली