महिला महाविद्यालय परिसरातील ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:51 IST2021-02-05T08:51:31+5:302021-02-05T08:51:31+5:30

गडचिरोली : शहरातील चंद्रपूर रोडवरील महिला महाविद्यालय परिसरातील ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण करून वयोवृद्ध नागरिक व बालकांसाठी विरंगुळ्याची सोय निर्माण ...

Beautify the open space in the women’s college campus | महिला महाविद्यालय परिसरातील ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण करा

महिला महाविद्यालय परिसरातील ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण करा

गडचिरोली : शहरातील चंद्रपूर रोडवरील महिला महाविद्यालय परिसरातील ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण करून वयोवृद्ध नागरिक व बालकांसाठी विरंगुळ्याची सोय निर्माण करावी, अशी मागणी नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे की, महिला महाविद्यालयाजवळील कोर्ट काॅलनीजवळ ओपन स्पेस जवळपास ६ हजार स्क्वेअर फूट जागा उपलब्ध आहे. या परिसरात कोर्ट काॅलनी, अनमोलनगर, रेव्हनी काॅलनी परिसर असून, या परिसरात मोठी वस्ती आहे. मात्र, याठिकाणी नागरिकांसाठी एकही विरंगुळ्याचे साधन नाही. ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण झाल्यास ज्येष्ठ नागरिक, मुले, महिलांना सकाळ-सायंकाळी विरंगुळ्यासाठी साधन उपलब्ध होईल. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची मागणी लक्षात घेता महिला महाविद्यालय परिसरातील ले-आऊटमध्ये सौंदर्यीकरणाचे काम मंजूर करावे आणि या परिसरातील नागरिकांना सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटी सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर, मयूर भट, स्वप्नील वडेट्टीवार, अजय जैन, परशुराम वाढणकर, श्यामराव सिलमवार, बाबूराव कातरकर, स्वप्नील अडेट्टीवार, नरेश मेश्राम, प्रमोद बोधाने, प्रफुल बिजवे, साई सिलमवार, नारायण गोरले, अमित तलांडी, शरद गिऱ्हेपुंजे, श्रीकांत कातरकर, सुधाकर मेश्राम आदींनी केली आहे.

Web Title: Beautify the open space in the women’s college campus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.