संस्कृती रक्षणासाठी एकजूट व्हा
By Admin | Updated: December 4, 2014 23:10 IST2014-12-04T23:10:01+5:302014-12-04T23:10:01+5:30
आदिवासी समाज अज्ञान व अविकासाच्या गर्तेत आकंठ बुडालेला असला तरी संस्कृती रक्षणाचे काम अविरत करीत आहे. सुशिक्षितांनीही संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी एकजूट व्हावे, असे प्रतिपादन काँग्रेसचे

संस्कृती रक्षणासाठी एकजूट व्हा
धानोरा : आदिवासी समाज अज्ञान व अविकासाच्या गर्तेत आकंठ बुडालेला असला तरी संस्कृती रक्षणाचे काम अविरत करीत आहे. सुशिक्षितांनीही संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी एकजूट व्हावे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले.
मुस्का येथे आयोजित गोंडी धर्म संमेलन तथा आदिवासी जनजागरण मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली व गोंडवाना युवा विकास मंच मुस्का तथा गोंडी संस्कृती बचाव समिती परसवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गोंडीधर्म संमेलन तथा आदिवासी जनजागरण मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आरमोरीचे माजी आमदार आनंदराव गेडाम होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार हिरामण वरखडे, समाजसेवक देवाजी तोफा, खुशालसिंह सुरपाम तर प्रमुख अतिथी म्हणून सगुणा तलांडी, धानोरा पंचायत समितीच्या सभापती कल्पना वड्डे, जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्ष भावना वानखेडे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हसनअली गिलानी, प्रा. दौलत धुर्वे, गणेश हलामी, बंडू तिलगामे, सरपंच अनुजा ताडाम, डॉ. ताराम, डॉ. टेकाम, संदीप वरखडे, ग्रामसेवक सोनपिपरे, तलाठी जांगी, देवाजी आतला, नयन काटेंगे, डॉ. संतोष डाखारे, आरोग्य सेविका उईके, क्षेत्र सहाय्यक साखरकर, वनरक्षक दातार उपस्थित होते.
आदिवासी बांधवांनी गोटूलच्या स्थापनेकडे लक्ष द्यावे, असे मार्गदर्शन उपस्थितांनी केले. कार्यक्रमाचे संचालन राजेश तुलावी, प्रास्ताविक डॉ. योगेश कुमरे तर आभार डॉ. मंगेश कुमरे यांनी मानले. गोंडवाना युवा विकास मंच व संस्कृती बचाव समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले.