मातृभाषेचा अभिमान बाळगा - प्राचार्य बुद्धे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:09 IST2021-02-21T05:09:31+5:302021-02-21T05:09:31+5:30
विनायक विद्यालय विसोरा येथे मातृभाषा दिन कार्यक्रमात ते बाेलत हाेते. शिक्षक, विद्यार्थ्यांनी मातृभाषा विषयी मनोगत व्यक्त केले. त्यात ...

मातृभाषेचा अभिमान बाळगा - प्राचार्य बुद्धे
विनायक विद्यालय विसोरा येथे मातृभाषा दिन कार्यक्रमात ते बाेलत हाेते. शिक्षक, विद्यार्थ्यांनी मातृभाषा विषयी मनोगत व्यक्त केले. त्यात मराठी विषय शिक्षक एस. एम. कापगते यांनी आंतराष्ट्रीय मातृभाषा दिनाचा संपूर्ण इतिहास सांगितला. तसेच मातृभाषेतून बोलल्यास आपल्या मनातील विचार चांगल्या प्रकारे व्यक्त करता येतात. त्यामुळे जगात कुठेही गेल्यास मातृभाषेचा आग्रह करावा जेणेकरून मातृभाषा संवर्धन होईल. आपण सर्वांनी मातृभाषा बाेलावी, आंतराष्ट्रीय मातृभाषा दिन कधीपासून साजरा करण्यात येत आहे हे सांगितले. मातृभाषा आपल्या जीवनात कशी रूजते यावरही प्रकाश टाकला. इयत्ता ९ वीची प्रांजली दूफारे हिने सांगितले कि, इंग्रजी भाषेकडे आपण आकर्षित होत असतांना समृद्ध अशा भाषेला विसरता नये वा न्यूनगंड ठेवू नये. यावेळी टी. डी. ठेंगरे, ए. बी. बुराडे उपस्थित होते. संचालन व आभार एच. जी. मडावी यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.
फोटो- कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्राचार्य आणि विद्यार्थी.