गावात खेळाडूंसाठी व्यासपीठ व्हावे

By Admin | Updated: December 25, 2016 01:47 IST2016-12-25T01:47:42+5:302016-12-25T01:47:42+5:30

गावात होत असलेल्या छोट्या-मोठ्या स्पर्धेतील सहभागी खेळाडू आज आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करीत आहे.

To be a platform for the players in the village | गावात खेळाडूंसाठी व्यासपीठ व्हावे

गावात खेळाडूंसाठी व्यासपीठ व्हावे

हरिराम वरखडे यांचे प्रतिपादन : रात्रकालीन कबड्डी स्पर्धेस प्रारंभ
आरमोरी : गावात होत असलेल्या छोट्या-मोठ्या स्पर्धेतील सहभागी खेळाडू आज आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करीत आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक खेळाला महत्त्व प्राप्त झाले असल्याने खेळाडूंच्या सर्वांगिण विकासासाठी गावागावात व्यासपीठ होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार हरिराम वरखडे यांनी केले.
समता क्लबच्या वतीने आरमोरी येथे रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार क्रिष्णा गजबे होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस भारत बावणथडे, तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, समता क्लबचे अध्यक्ष तथा लागवड अधिकारी भुषणसिंह खंडाते, आरमोरीचे पोलीस निरिक्षक रणजीत पाटील, महेंद्र शेंडे, प्रसाद साळवे, नंदू नाकतोडे, राहूल तितीरमारे, संजय बिडवाईकर, जयंत राऊत, राजेश धात्रक आदी मान्यवर उपस्थित होते. सदर रात्रकालीन कबड्डी स्पर्धेत विदर्भातून एकूण ३६ संघांनी सहभाग दर्शविला आहे. प्रास्ताविक भूषणसिंह खंडाते, संचालन बंडू रोहणकर यांनी केले तर आभार मैंद यांनी मानले. यशस्वीतेसाठी महेश उरकुडे, पराग वाघाडे, पंकज फुलबांधे, अक्षय बागळे, पप्पू भोयर आदींनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: To be a platform for the players in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.