बीडीओंचा आदिवासींशी संवाद

By Admin | Updated: March 2, 2016 01:59 IST2016-03-02T01:59:54+5:302016-03-02T01:59:54+5:30

जिल्ह्यात बिनागुंडा हे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जात असले तरी तेथे पोहचणे ....

BD's interaction with tribals | बीडीओंचा आदिवासींशी संवाद

बीडीओंचा आदिवासींशी संवाद

बिनागुंडाला दिली भेट : फरेंद्र कुत्तीरकर यांनी नागरिकांच्या जाणल्या समस्या
भामरागड : जिल्ह्यात बिनागुंडा हे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जात असले तरी तेथे पोहचणे सर्वसामान्यांना शक्य नाही. डोंगरकपारीत वसलेल्या या गावाला आतापर्यंतच्या अधिकाऱ्यांनी साधी भेटही दिली नाही. मात्र तालुक्याच्या विकासासाठी पुढाकार घेतलेल्या संवर्ग विकास अधिकारी फरेंद्र कुत्तीरकर यांनी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या बिनागुंडा गावाला भेट दिली. नव्हे तर येथील नागरिकांना शासकीय विविध योजनांची माहिती देऊन योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
डोंगरदऱ्यांच्या मध्यभागी वसलेले बिनागुंडा हे गाव भौगोलिकदृष्ट्या अतिदुर्गम क्षेत्रात येते. त्यामुळे या गावाला अधिकाऱ्यांचे फारसे दर्शन होत नाही. मात्र संवर्ग विकास अधिकारी कुत्तीरकर यांनी गावाला भेट देऊन सभेचे आयोजन केले. सभेच्या माध्यमातून थेट नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या शासनाच्या कल्याणकारी विविध योजनांची माहिती देत योजनांचा लाभ घेण्यासाठी करावयाची कार्यवाही संदर्भात मार्गदर्शन करण्यात आहे.
याप्रसंगी संवर्ग विकास अधिकारी कुत्तरकर यांनी बिनागुंडा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली. स्थानिक नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या जाणून घेत उपस्थित कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची आरोग्य सेवा कमी पडू देऊ नका, असे आदेश देत सर्वतोपरी आपल्यास्तरावर मदत करण्याचेही आश्वासन यावेळी बीडीओ कुत्तीरकर यांनी दिले.
बोलीभाषेची समस्या असली तरी मध्यस्थांच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेत कर्मचाऱ्यांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या व त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी विस्तार अधिकारी आत्राम, पंधरो, काळबांधे, चव्हाण, मारबते आदींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: BD's interaction with tribals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.