कुनघाडा व तळाेधीत अस्तित्वाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:30 IST2021-01-15T04:30:32+5:302021-01-15T04:30:32+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क चामाेर्शी : कुनघाडा रै. व तळाेधी या चामाेर्शी तालुक्यातील सर्वात माेठ्या ग्रामपंचायती आहेत. या ठिकाणी काॅंग्रेस ...

The battle of existence in Kunghada and Taladhi | कुनघाडा व तळाेधीत अस्तित्वाची लढाई

कुनघाडा व तळाेधीत अस्तित्वाची लढाई

लाेकमत न्यूज नेटवर्क

चामाेर्शी : कुनघाडा रै. व तळाेधी या चामाेर्शी तालुक्यातील सर्वात माेठ्या ग्रामपंचायती आहेत. या ठिकाणी काॅंग्रेस व भाजप या दाेन पक्षांमध्ये सरळ लढत आहे. स्थानिक नेत्यांसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई असल्याने घराेघरी फिरून प्रचारावर भर दिला जात आहे.काॅंग्रेस प्रणीत स्वग्राम विकास आघाडीने ग्रामपंचायतीच्या सर्व १५ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. एक जागा अविराेध पदरात पाडून घेतली आहे. तर एका जागेवर अपक्ष उमेदवारासाेबत लढत आहे. माजी सरपंच अविनाश चलाख यांच्या नेतृत्वात स्वग्राम विकास आघाडी तर जि.प. कृषी सभापती प्रा. रमेश बारसागडे, माजी पं.स. सभापती आनंद भांडेकर यांच्या नेतृत्वात भाजपप्रणित आदर्श आघाडी त्यांना टक्कर देत आहे. दाेन्ही पक्षांनी ग्रामपंचायतीवर आपला झेंडा राेवण्यासाठी कंबर कसली आहे.

याच परिसरात तळाेधी माेकासा ही माेठी ग्रामपंचायत आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत तीन गट तयार केले आहेत. अतुल सुरजागडे यांनी सर्व ११ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. माजी पं.स. उपसभापती बंडू चिळंगे यांनी ७ उमेदवार उभे केले ओहत. तर सामाजिक कार्यकर्ते मनाेहर बाेदलवार यांनी सर्व ११ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

Web Title: The battle of existence in Kunghada and Taladhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.