नक्षल्यांमुळे विकासात अडसर
By Admin | Updated: July 31, 2015 01:40 IST2015-07-31T01:40:14+5:302015-07-31T01:40:14+5:30
२८ जुलै ते ३ आॅगस्टदरम्यान नक्षलवाद्यांकडून जिल्ह्यात शहीद सप्ताह पाळला जात आहे.

नक्षल्यांमुळे विकासात अडसर
बुर्गीत शांतता रॅली : पोलीस मदत केंद्राचा परिसरातील गावांना संदेश
एटापल्ली : २८ जुलै ते ३ आॅगस्टदरम्यान नक्षलवाद्यांकडून जिल्ह्यात शहीद सप्ताह पाळला जात आहे. या सप्ताहादरम्यान नक्षल्यांकडून अनेक ठिकाणी उपद्व्यापाच्या घटना घडत आहेत. या घटनांमुळे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विकासाला अडसर निर्माण होतो. नक्षलवाद हा समाजाला घातक आहे, असा संदेश तालुक्यातील बुर्गी येथे पोलीस मदत केंद्राच्या वतीने काढण्यात आलेल्या नक्षलविरोधी रॅलीतून परिसरातील नागरिकांना देण्यात आला.
नक्षलविरोधी शांतता रॅलीदरम्यान पोलीस मदत केंद्राच्या परिसरात घेण्यात आलेल्या सभेला प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डी. जी. तलेदवार, पोलीस उपनिरीक्षक अतुलकुमार ठोकळ व अनेक गावातील पोलीस पाटील व नागरिक उपस्थित होते. तलेदवार यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच साक्षरता मोहीम व सामूहिक विवाह सोहळा याबाबत माहिती दिली. शांतता रॅली पोलीस मदत केंद्रातून काढून बुर्गी येथील संपूर्ण रस्त्यांनी फिरविण्यात आली.