येर्रावागू तलावावरील बंधारा तुटलेलाच
By Admin | Updated: November 16, 2015 01:25 IST2015-11-16T01:25:32+5:302015-11-16T01:25:32+5:30
सिरोंचा तालुक्यातील आसरअल्लीनजीकच्या लक्ष्मीदेवपेठा ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या येर्रावागू तलावावर ...

येर्रावागू तलावावरील बंधारा तुटलेलाच
४० वर्षे उलटली : आसरअल्ली भागात सिंचन व्यवस्थेचा बोजवारा
आसरअल्ली : सिरोंचा तालुक्यातील आसरअल्लीनजीकच्या लक्ष्मीदेवपेठा ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या येर्रावागू तलावावर १९६० मध्ये सिंचन विभागाच्या वतीने बंधारा बांधण्यात आला. त्यावेळी या भागातील शेकडो एकर शेतजमीनीला सिंचन सुविधा निर्माण झाले. मात्र येर्रावागू तलावाचा बंधारा तुटल्यामुळे सिंचन सुविधेचा पूर्णत: बोजवारा वाजला आहे. गेल्या ४० वर्षांपासून बंधारा तुटलेल्या अवस्थेत असल्याने या भागातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.
त्यावेळी येर्रावागू नाला खूप लहान होता. त्यामुळे पुलाच्या ऐवजी या नाल्यावर सिमेंट काँक्रीटचा रपटा तयार करण्यात आला. मात्र ४० वर्षांपूर्वी येर्रावागू तलावाचा बंधारा तुटल्यामुळे येर्रावागू नाल्यामुळे आता नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आता येर्रावागू नाल्यावर १७ कोटी रूपयांच्या खर्चातून मोठा पूल मंजूर करण्यात आला असून त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. येर्रावागू तलावावरील जुना बंधारा तुटल्यामुळे याचा आसरअल्ली भागातील आसरअल्ली भागातील ४५ ते ५० गावातील शेतजमिनीला फटका बसला.
लक्ष्मीदेवपेठा येथील सरपंच व्यंकटेश्वरलू शानगोंडा यांनी तुटलेल्या बंधाऱ्याला भेट देऊन तलावाची पाहणी केली. या ठिकाणी नव्याने बंधारा बांधण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोनदा या भागात येऊन येर्रावागू तलाव व बंधाऱ्याची पाहणी केली. मात्र त्यानंतर प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. प्रशासनाचे आसरअल्ली भागाच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. (वार्ताहर)