शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

बापरे! पब्जीच्या नादात मुलगा इमारतीवरुन कोसळला, अहेरी येथील घटना

By संजय तिपाले | Published: October 11, 2023 5:24 PM

पालकांनो, लक्ष द्या : जखमी मुलावर उपचार सुरु

गडचिरोली : खेळणीप्रमाणे हल्ली लहान मुलांच्या हाती मोबाइल आहेत. मात्र, या मोबाइलमध्ये डोके घालून बसलेली मुले नेमकी काय करत आहेत, काय पाहत आहेत, याकडे पालकांचे लक्ष नसते, त्यामुळे मुलांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालकांची काळजी वाढविणारी अशीच एक घटना ११ ऑक्टोबरला अहेरीतून आली आहे. पब्जी गेमच्या आहारी गेलेला १४ वर्षीय मुलगा दोन मजली इमारतीवरुन कोसळला, त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

अहेरी येथील पॉवर हाऊस मार्गाच्या हॉकी ग्राउंड जवळील दुमजली इमारतीत राहणाऱ्या  एका नामांकित शाळेतील नववीच्या वर्गात शिकणारा मुलगा पब्जी गेमच्या आहारी गेलेला आहे. १० ऑक्टोबरला तो छतावर जाऊन मोबाइलवर पब्जी गेम खेळत होता. गेम मध्ये तो एवढा व्यग्र झाला की चालत- चालत  तो थेट इमारतीवरुन खाली कोसळला.    त्याला तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, छातीसह हाताचे हाड फ्रॅक्चर असल्यान अधिक उपचारााठी चंद्रपूरला हलविण्यात आले.

शाळकरी व महाविद्यालयीन मुलांच्या हाती सहजपणे मोबाइल पडतात. मुले ऑनलाइन गेम्सच्या आहारी जातात. यातील काही ॲप्स हे पैसे मोजून घ्यावे लागतात तर काही ॲप्स हे विनामोबादला डाऊनलोड होतात. या गेमस्च्या आहारी गेलेल्या मुलांचे अभ्यासाकडे तर लक्ष नसतेच, पण जेवण, झोपही ते विसरुन जातात. त्यात अपयशी झाल्याने काही मुले खचून जातात, यातून ते टोकाचे पाऊल उचलण्याची शक्यता असते. त्यामुळे पालकांनी वेळीच सावध होणे आवश्यक बनले आहे.

टॅग्स :AccidentअपघातPUBG Gameपबजी गेमGadchiroliगडचिरोली