पीककर्ज देण्यास बॅँकेची टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:42 IST2021-08-12T04:42:10+5:302021-08-12T04:42:10+5:30
चामाेर्शी येथील बँक ऑॅफ महाराष्ट्र शाखेत गेल्या एक महिन्यापासून पूर्णवेळ व्यवस्थापक नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. सद्य:स्थितीत ...

पीककर्ज देण्यास बॅँकेची टाळाटाळ
चामाेर्शी येथील बँक ऑॅफ महाराष्ट्र शाखेत गेल्या एक महिन्यापासून पूर्णवेळ व्यवस्थापक नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. सद्य:स्थितीत धान रोवणी संपत असल्याने शेतकऱ्यांकडे खत, बी-बियाण्याची उधारी देणे व दैनंदिन जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी पैसे शिल्लक नसल्याने ते हैराण झाले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत शेतकरी गेले असता त्यांना अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात आली व अरेरावीची भाषा वापरून हाकलून लावले, असा आराेप शेतकऱ्यांनी केला. यासंदर्भात लखमापूर बाेरी व परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविले आहे, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला ग्रा.पं. सदस्य भाग्यवान पिपरे, सुनील वैरागडे, गुरुदेव पिपरे, अशोक चलाख, जगदीश राॅय, दीपक दास, सुनील झाडे, पुरुषोत्तम बोरीकर, सुरेश सातपुते, अविनाश कुनघाडकर व परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. याबाबत बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता बँकेला पूर्णवेळ व्यवस्थापक उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती दिली.
090821\1556img-20210809-wa0069.jpg
पीककर्ज देण्यास चामोर्शी महाराष्ट्र बँकेची टाळाटाळ