पेरमिलीची बँक फोडली
By Admin | Updated: March 5, 2016 01:20 IST2016-03-05T01:20:45+5:302016-03-05T01:20:45+5:30
अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत अज्ञात चोरट्यांनी ३ मार्चच्या मध्यरात्री गेट व दरवाजा तोडून एटीएम मशीनची तोडफोड केली.

पेरमिलीची बँक फोडली
एटीएमची तोडफोड : पैशांअभावी चोरटे खाली हातानेच परतले
पेरमिली : अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत अज्ञात चोरट्यांनी ३ मार्चच्या मध्यरात्री गेट व दरवाजा तोडून एटीएम मशीनची तोडफोड केली. परंतु एटीएम मशीनमध्ये पैसे शिल्लक नसल्याने बँक फोडूनही चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. परिणामी चोरट्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले.
पेरमिली येथे बँक आॅफ महाराष्ट्राची शाखा असून या बँकेत जवळपास ३० गावातील ग्राहकांचे बँक खाते आहेत. सर्व व्यवहार ग्राहक याच बँकेतून करीत असतात. त्यामुळे बँकेचा आवाकाही बऱ्याच प्रमाणात आहे. बँकेत सर्वप्रकारचे वित्तीय व्यवहार होत असल्याची बाब लक्षात घेऊन अज्ञात चोरट्यांनी ३ मार्चच्या मध्यरात्री बँकेवर धावा बोलत मुख्य गेट व दरवाजा फोडला. त्यानंतर एटीएम मशीनच्या समोरील कॅबिन फोडले. परंतु एटीएममध्ये एकही रूपया शिल्लक नव्हता. गुरूवारीच एटीएममधील रोकड संपली होती. शुक्रवारी मशीनमध्ये कॅश लोड करणार होते. परंतु चोरट्यांना योग्य वेळ व संधी साधता आली नाही. परिणामी त्यांना बँक फोडून सुद्धा रिकाम्या हातानेच परतावे लागले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरणाची चौकशी केली व अज्ञात आरोपींवर गुन्हा नोंदविला. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
यापूर्वीही गावात अज्ञात चोरट्यांकडून चोरीचे प्रयत्न करण्यात आले. किरकोळ चोरीच्या घटनाही गावात घडलेल्या आहेत. बँक फोडण्याच्या या घटनेची संपूर्ण परिसरात चर्चा होती.
वीज कनेक्शन, कॅमेरेही तोडले
पेरमिली येथील बँक आॅफ महाराष्ट्राच्या शाखेत चोरीचा प्रयत्न करण्यापूर्वी अज्ञात चोरट्यांनी बँकेतील वीज कनेक्शन तसेच सीसीटीव्ही कॅमेरेही तोडले. त्यानंतर काही कॅमेऱ्यांची दिशा बांबूच्या सहाय्याने बदलली. त्यानंतर चोरीचा प्रयत्न केला. मात्र एटीएम मशीनमध्ये रोकड शिल्लक नसल्याने त्यांना खाली हातानेच परतावे लागले.