बॅंकांच्या संपामुळे कामकाज प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:36 IST2021-03-16T04:36:36+5:302021-03-16T04:36:36+5:30
गडचिराेली : राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या कर्मचाऱ्यांनी साेमवारी व मंगळवारी संप पुकारला आहे. राष्ट्रीयीकृत बॅंका बंद असल्यामुळे कामकाज काही प्रमाणात ...

बॅंकांच्या संपामुळे कामकाज प्रभावित
गडचिराेली : राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या कर्मचाऱ्यांनी साेमवारी व मंगळवारी संप पुकारला आहे. राष्ट्रीयीकृत बॅंका बंद असल्यामुळे कामकाज काही प्रमाणात प्रभावित झाले.
विविध मागण्यासाठी युनाईटेड फाेरम ऑफ बॅंक युनियनतर्फे साेमवारपासून संप पुकारला आहे. मंगळवारी संपाचा शेवटचा दिवस आहे. या संपात केवळ राष्ट्रीयीकृत बॅंकांचे कर्मचारी सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बॅंका बंद हाेत्या. त्यामुळे काही प्रमाणात काम प्रभावित झाले. मात्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखा, ग्रामीण बॅंका, खासगी बॅंका सुरू हाेत्या. याही बॅंकांमध्ये अनेक नागरिकांची खाते आहेत. आर्थिक बाब या बॅंकांनी सांभाळली. ज्या मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे, त्या मागणी अतिशय रास्त आहेत. त्यामुळे शासनाने या मागण्या पूर्ण कराव्या, अशी प्रतिक्रिया बॅंक ऑफ बडाेदा एम्प्लाॅइज युनियनचे बॅंक सेक्रेटरी नितीन चिचघरे यांनी व्यक्त केली.