कारवाईच्या धसक्याने पानझडी जंगलात वनव्यांना प्रतिबंध
By Admin | Updated: March 4, 2016 01:28 IST2016-03-04T01:28:12+5:302016-03-04T01:28:12+5:30
ज्या वनव्याप्त क्षेत्रात जंगलांना आगी लागते, त्या वन परिक्षेत्रातील वनपाल व वनरक्षकांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, ...

कारवाईच्या धसक्याने पानझडी जंगलात वनव्यांना प्रतिबंध
वैरागड : ज्या वनव्याप्त क्षेत्रात जंगलांना आगी लागते, त्या वन परिक्षेत्रातील वनपाल व वनरक्षकांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार यांनी केली. या घोषणेनंतर वनपाल व वनरक्षकांनी कारवाईचा धसका घेऊन ते सतर्क झाले आहेत. परिणामी पानझडीच्या जंगलातील वनव्याला प्रतिबंध लागला असल्याचे दिसून येते.
यंदा आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वन विभागाने ज्या काही उपाययोजना केल्या. त्या यशस्वी होत असल्याची माहिती आरमोरीचे वन परिक्षेत्राधिकारी पी. आर. तांबटकर यांनी लोकमतला दिली आहे. वनवे लागण्याच्या खऱ्या कारणांचा वन विभागाने शोध घेतल्यानंतर जंगलाला आगी लागल्याचे प्रमाण कमी झाले. गतवर्षी वनव्यावर उपग्रहाची नजर राहणार, असे वन विभागाने जाहीर केले होते. मात्र यानंतरही अनेक ठिकाणीची जंगले आगीत स्वाह झाली. यावर्षी जंगलाला आग लागल्यास संबंधितांवर थेट पोलीस विभागामार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आगीला वनरक्षक व वनपालाला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाईचा इशारा देताच हे दोन्ही वनकर्मचारी वनव्याच्या बाबतीत अधिकच जागृत झाले आहेत. यंदा काही ठिकाणी वनव्याच्या किरकोळ घटना घडल्या.