वीज तारांना बांबूचा आधार

By Admin | Updated: May 24, 2016 01:38 IST2016-05-24T01:38:48+5:302016-05-24T01:38:48+5:30

कमलापूर-राजाराम मार्गावरील सूर्यापल्ली गावात वीजेच्या तारा लोंबकळत आहेत. येथील तारांना नागरिकांनी बांबूचा आधार दिला आहे.

Bamboo base for electricity stars | वीज तारांना बांबूचा आधार

वीज तारांना बांबूचा आधार

वीज विभागाचे दुर्लक्ष : सूर्यापल्लीतील तारा आहेत लोंबकळत
कमलापूर : कमलापूर-राजाराम मार्गावरील सूर्यापल्ली गावात वीजेच्या तारा लोंबकळत आहेत. येथील तारांना नागरिकांनी बांबूचा आधार दिला आहे. मात्र या विद्युत तारांना मानवाचा स्पर्श होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कमलापूर गावाला वीज पुरवठा करण्यासाठी काही वर्षांपूर्वी खांब गाडण्यात आले व त्यावरून वीज पुरवठा करण्यात आला आहे. मात्र वीज तारा व्यवस्थित ताणल्या गेल्या नाही. त्यामुळे त्या जमिनीकडे लोंबकळत आहेत. या तारांना पाळीव जनावर किंवा मानवाचा स्पर्श होऊन धोका होण्याचा संभव असल्याने गावातील नागरिकांनी वीज तारांना बांबू लावून आधार दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे मुख्य मार्गाच्या बाजुलाच लोंबकळणाऱ्या तारा आहेत. त्यामुळे वाहनाचा स्पर्श होऊनही धोका होण्याची शक्यता वाढली आहे.
सूर्यापल्ली परिसरातील बहुतांश गावांमध्ये ही समस्या कायम आहे. याबाबत नागरिकांनी विद्युत विभागाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. मात्र याकडे वीज विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. (वार्ताहर)

Web Title: Bamboo base for electricity stars