पानटपरीत शिरले बाेलेराे वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:51 IST2021-02-26T04:51:18+5:302021-02-26T04:51:18+5:30

सुदैवाने दाेन बालके बचावली. मनीषा विनायक वाडगुरे (३०, रा. पिसेवडधा) व नानाजी मडावी (५०, रा. थाेटेबाेडी) अशी गंभीर जखमी ...

Balerae vehicle entered the pant | पानटपरीत शिरले बाेलेराे वाहन

पानटपरीत शिरले बाेलेराे वाहन

सुदैवाने दाेन बालके बचावली.

मनीषा विनायक वाडगुरे (३०, रा. पिसेवडधा) व नानाजी मडावी (५०, रा. थाेटेबाेडी) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. बाेलेराे पिकअप वाहनाच्या चालकाने झुमर विक्रेत्यांना पिसेवडधा येथील महसूल विभागाच्या कार्यालय परिसरात साेडले. वाहनाला चावी ठेवून चालक झुमरवाल्यांकडून भाड्याचे पैसे घेण्याकरिता खाली उतरला. पैसे मागत असताना त्यातीलच एका झुमरवाल्याने गाडी चालून बघतो, असे म्हणून गाडी सुरू केली असता त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे वाहन सरळ मनीषा वाडगुरे यांच्या पानटपरीत शिरले. पानटपरीवर बसलेली महिला पानटपरीसह १० फूट अंतरापर्यंत फरफटत गेली. चहा घेण्याकरिता आलेले नानाजी मडावी हेदेखील गंभीर जखमी आहेत. मात्र, सुदैवाने दोन चिमुकले मुले वाचली. सदर घटनेची माहिती पोलीसपाटील ऋषी वटी यांनी धानोरा पोलीस स्थानकाला दिलेली आहे.

Web Title: Balerae vehicle entered the pant