भरमार बंदुका पोलिसात जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 23:37 IST2017-12-12T23:37:14+5:302017-12-12T23:37:42+5:30
भामरागड तालुक्यातील गोंगवाडा व एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाºया हिक्केर व हिंदूर येथील नागरिकांनी त्यांच्या जवळील भरमार बंदुका पोलिसांकडे परत केले आहेत.

भरमार बंदुका पोलिसात जमा
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील गोंगवाडा व एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाºया हिक्केर व हिंदूर येथील नागरिकांनी त्यांच्या जवळील भरमार बंदुका पोलिसांकडे परत केले आहेत.
गडचिरोली पोलिसांच्या वतीने नक्षलविरोधी अभियान राबविली जात आहे. नक्षलदृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या हिक्केर व हिंदूर येथील नागरिकांनी पोलिसांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत सात भरमार रायफल व एक भरमार नळी गट्टाचे प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस उपनिरिक्षक योगेश दाभाडे यांच्या उपस्थितीत पोलिसांकडे जमा केली. हिक्केर व हिंदूर ही महाराष्टÑ-छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेली गावे आहेत. भरमार बंदुका जप्त केल्यानंतर नागरिकांचे पोलीस अधिकाºयांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. यावेळी प्रभारी अधिकारी योगेश दाभाडे, पोलीस उपनिरिक्षक देवरे, पोलीस उपनिरिक्षक तनपुरे, गोपाले, बोरकर, खंडारे आदी उपस्थित होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी भरडे यांच्या मार्गदर्शनात नक्षल्यांचा पीएलजीए सप्ताह सुरू असताना नक्षल विरोधी अभियान राबविले जात होते. याच अभियानादरम्यान पोलीस मदत केंद्र धोडराजचे पोलीस उपनिरिक्षक शिवराज धडवे, काळे, सरोदे, सीआरपीएफचे असिस्टंट कमांडट मनोहरी यांनी गोंगवाडा येथील नागरिकांना बंदुका परत करण्याचे आवाहन केले. चार नागरिकांनी भरमार बंदुका परत केल्या. पोलीस अधिकाºयांनी त्यांचे कौतुक केले.