निकृष्ट पोषण आहार बदलून मिळेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2016 01:37 IST2016-02-03T01:37:14+5:302016-02-03T01:37:14+5:30
एकात्मिक बाल विकास प्रकल्प अहेरी कार्यालयाच्या मार्फतीने संपूर्ण तालुक्यात किशोरवयीन मुलींकरिता पुरविण्यात येत असलेल्या पोषण आहाराचे साहित्य ....

निकृष्ट पोषण आहार बदलून मिळेल
तिखट व हळदीचे नमुने घेतले : उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट
जिमलगट्टा : एकात्मिक बाल विकास प्रकल्प अहेरी कार्यालयाच्या मार्फतीने संपूर्ण तालुक्यात किशोरवयीन मुलींकरिता पुरविण्यात येत असलेल्या पोषण आहाराचे साहित्य (तिखट, हळद) निकृष्ट दर्जाचे असल्याचे वृत्त ‘लोकमत’ मध्ये २४ जानेवारी रोजी प्रकाशित करण्यात आले होते. या बातमीची दखल घेऊन महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांनी जिमलगट्टा जवळील रसपल्ली येथे भेट दिली व निकृष्ट दर्जाचे साहित्य बदलून दिले जातील, असे आश्वासन दिले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. आर. जाधव यांनी पोषण आहाराची पाहणी केली. तिखट, हळद यांचे नमुने जमा केले. सदर नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविण्यात येतील, नमुन्यांच्या तपासणीनंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासोबत एकात्मिक बाल विकास अहेरीचे आर. डी. मेश्राम यांच्यासह लाभार्थी व पालक उपस्थित होते.
जाधव यांच्यासमोर पालकांनी समस्या मांडल्या. या समस्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर आपण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.