दुचाकी अपघातात बाप-लेक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:34 IST2021-04-12T04:34:48+5:302021-04-12T04:34:48+5:30
चिंतामण माधनवार, वय ४५ व प्रफुल्ल चिंतामण माधनवार, वय २५, रा. मौशिखांब, ता.आरमोरी, असे जखमी बाप-लेकाची नावे आहेत. हे ...

दुचाकी अपघातात बाप-लेक गंभीर जखमी
चिंतामण माधनवार, वय ४५ व प्रफुल्ल चिंतामण माधनवार, वय २५, रा. मौशिखांब, ता.आरमोरी, असे जखमी बाप-लेकाची नावे आहेत. हे दोघेही दुचाकीने (क्र. एम.एच.३३ एस ०४५९) मौशिखांब येथून चामोर्शी तालुक्यातील मजेगाव येथे काही कामानिमित्त आले होते. काम आटोपून मार्कंडामार्गे आष्टीकडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने समोरून धडक दिली. यात दुचाकीस्वार गाडीवरून खाली पडले. त्यांच्या उजव्या पायाला जबर मार लागला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले व त्यांनी जखमींना आष्टी येथील रुग्णालयात हलविले. अज्ञात वाहनांचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील कारवाही पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक संघरक्षित फुलझेले, संजय गोंगले, सुरेश दुर्गे करीत आहेत.