बसचे एक्सल तुटले, २५ प्रवासी बालंबाल बचावले, चालकाचे प्रसंगावधान

By गेापाल लाजुरकर | Updated: January 30, 2024 15:05 IST2024-01-30T15:04:42+5:302024-01-30T15:05:45+5:30

ही घटना मंगळवारी दुपारी १२:३० वाजता सिरोंचा पासून ३२ किमी अंतरावर घडली.

Axle of the bus broke, 25 passengers escaped unharmed | बसचे एक्सल तुटले, २५ प्रवासी बालंबाल बचावले, चालकाचे प्रसंगावधान

बसचे एक्सल तुटले, २५ प्रवासी बालंबाल बचावले, चालकाचे प्रसंगावधान

गडचिरोली : अहेरी बस आगारातून सिरोंचा मार्गाने सकाळी ९:३० वाजता निघालेल्या मानव विकास मिशनच्या बसेसचे एक्सल उमानूर पहाडीवर तुटले. ही बाब वेळीच चालकाच्या लक्षात आली व त्याने बस जागीच रोखली सुदैवाने अपघात टळला व बसमधील २५ प्रवासी बालंबाल बचावले. ही घटना मंगळवारी दुपारी १२:३० वाजता सिरोंचा पासून ३२ किमी अंतरावर घडली.

अहेरी बस आगाराची अहेरी- आसरअल्ली- सिरोंचा ही बस मंगळवारी सकाळी ९:३० वाजता अहेरीवरून निघाली. ही बस अहेरी, सिरोंचा व त्यानंतर आसरअल्लीला जाते. या बसमध्ये बहुसंख्य प्रवासी होते. हा मार्ग खड्डेमय असल्याने या मार्गाने नागरिकांना बसमधून प्रवास करताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. त्यातच मंगळवारी मानव विकास मिशनची बस उमानूर पहाडीवर आली असता, अचानक बसचे एक्सल तुटले. 

ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने बस थांबवली. बस सुरूच राहिली असती तर ती उलटण्याचा धोका होता. चालकाने बस जागीच थांबविल्याने प्रवासी बसमधून खाली उतरले. त्यानंतर प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली.अहेरी- सिरोचा मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले असल्याने प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

Web Title: Axle of the bus broke, 25 passengers escaped unharmed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.