रॅलीतून हिवताप निर्मूलनावर जागृती

By Admin | Updated: April 26, 2017 01:08 IST2017-04-26T01:08:01+5:302017-04-26T01:08:01+5:30

जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून शहरातील इंदिरा गांधी चौकातून रॅली काढण्यात आली.

Awareness on the elimination of malaria from rallies | रॅलीतून हिवताप निर्मूलनावर जागृती

रॅलीतून हिवताप निर्मूलनावर जागृती

जिल्हा रुग्णालयात समारोप : घोषवाक्य व संदेश फलकांच्या माध्यमातून प्रबोधन
गडचिरोली : जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून शहरातील इंदिरा गांधी चौकातून रॅली काढण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एस. जे. पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. इंदिरा गांधी चौकातून निघालेली रॅली मुख्य मार्गाने जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत पोहोचली. जिल्हा रुग्णालयात रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीदरम्यान हिवताप निर्मूलनाबाबत संदेश देण्यात आले. त्याचबरोबर घोषवाक्यांच्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात आली.
नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती केशव निंबोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांनी हिवताप रोग शोधाचे जनक रोनाल्ड रॉस यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. गडचिरोली जिल्हा हिवतापाबाबत संवेदनशील समजला जातो. हिवतापापासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Awareness on the elimination of malaria from rallies