Awareness Day for Cancer Day | कर्करोग दिनानिमित्त जनजागृती

कर्करोग दिनानिमित्त जनजागृती

ठळक मुद्देजिल्हाभर कार्यक्रम : रॅलींमध्ये शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभाग, शाळा, महाविद्यालय, सीआरपीएफसह इतर विभागाच्या वतीने ४ फेब्रुवारी रोजी मंगळवारला रॅली काढून कर्करोगाविषयी जनजागृती करण्यात आली.
१९२ सीआरपीएफ बटालीयन, गडचिरोली - केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १९२ बटालीयनच्या वतीने येथील पोलीस संकुल कॅम्पमध्ये सीआरपीएफच्या गडचिरोली परिचालन रेंजचे पोलीस उपमहानिरीक्षक मानस रंजन यांच्या अध्यक्षतेखाली कर्करोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा सामान्य रूग्णालयाचे दंत चिकित्सक डॉ. मनीष मेश्राम, सीआरपीएफचे कमांडंट जियाऊ सिंह, उपकमांडंट कैैलास गंगावने, सपन, सुमन, संध्या राणी, वैैद्यकीय अधिकारी रविकिरण दिघाडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. मनीष मेश्राम यांनी सीआरपीएफ जवान व त्यांच्या कुटुंबीयांनी कर्करोगापासून दूर राहण्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे, असे सांगितले. पोलीस उपमहानिरीक्षक मानस रंजन यांनी कर्करोगापासून दूर राहण्यासाठी जवानांनी आरोग्याची काळजी नियमित घेतली पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमाला सीआरपीएफचे जवान उपस्थित होते.
एटापल्ली - सीआरपीएफ बटालीयन ९ च्या ब्रावो कंपनीच्या वतीने एटापल्ली तालुक्याच्या बुर्गी येथे जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट हरिष शर्मा होते. प्रमुख अतिथी म्हणून बुर्गी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर नैैताम, सीआरपीएफचे पोलीस निरीक्षक हिरालाल मीना, उपनिरीक्षक सुधाकर केंद्रे आदी उपस्थित होते. तंबाखू सेवन व मद्यपानामुळे कॅन्सर होतो. कॅन्सरची लक्षणे काय? याबाबतचे मार्गदर्शन डॉ. किशोर नैैताम यांनी केले. धुम्रपान व मद्यपान न करण्याची शपथ यावेळी नागरिकांनी घेतली. यशस्वीतेसाठी जवानांनी सहकार्य केले.

Web Title: Awareness Day for Cancer Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.