वडसा रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने जागरूकता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:33 IST2021-07-26T04:33:12+5:302021-07-26T04:33:12+5:30
ही मोहीम दक्षिण- पूर्व- मध्य रेल्वे नागपूर मंडळाचे मंडळ सुरक्षा आयुक्त पंकज चूघ यांच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असून, ...

वडसा रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने जागरूकता अभियान
ही मोहीम दक्षिण- पूर्व- मध्य रेल्वे नागपूर मंडळाचे मंडळ सुरक्षा आयुक्त पंकज चूघ यांच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असून, रेल्वेलाइनलगतच्या परिसरात रेल्वे नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी सूचना देण्यात येत आहेत.
रेल्वेलाइन परिसरातील काही विघ्नसंतोषी लाेकांनी चालत्या रेल्वेगाडीवर दगडफेक करून अनेकांना गंभीर जखमी केले आहे. दरम्यान, रेल्वेलाइनवर गुरेढोरे चारणे, रेल्वे फाटक बंद असल्यानंतरही वाहन फाटकाच्या खालून काढणे, यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे अपघात घडून येत आहेत.
वडसा रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने माेहिमेंर्तगत ब्रह्मपुरी ते सौंदड रेल्वे स्टेशनच्या मध्यवर्ती ठिकाणी रेल्वेलाइनच्या आसपासच्या गावांत याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी वडसा रेल्वे पोलीस बलाचे उपनिरीक्षक विजय भालोकर, प्रभारी उपनिरीक्षक पी.एस. मदने, एस.जे. बेंडे, राजेश ढोके, नीरज कुमार, विनय कुमार, रेल्वे सल्लागार समिती सदस्य ऋषी शेबे आदी अधिकारी गावभेटी देऊन नागरिकांना जागरूक करण्याची भूमिका बजावीत आहेत.
250721\img-20210725-wa0015.jpg
रेल्वे पोलिस अधिकारी गावकरी यांना मार्गदर्शन करतांना