तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाविरोधात केली जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:36 IST2021-01-13T05:36:29+5:302021-01-13T05:36:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आलापल्ली पोलीस स्टेशन व मुक्तिपथच्या संयुक्त विद्यमाने पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली आलापल्ली शहरातून रेझिंग ...

Awareness against tobacco use | तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाविरोधात केली जनजागृती

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाविरोधात केली जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क

आलापल्ली पोलीस स्टेशन व मुक्तिपथच्या संयुक्त विद्यमाने पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली आलापल्ली शहरातून रेझिंग डे सप्ताहाच्या अनुषंगाने व्यसनमुक्त संकल्प रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी रॅलीच्या माध्यमातून खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद करण्याचे आवाहन केले.

राणी दुर्गावती विद्यालय तथा सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थांनी रॅली काढून खर्रा व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाविरोधात जनजागृती केली. तसेच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याची पानठेलाधारकांना विनंती केली. सदर रॅली आलापल्ली येथील वीर बाबूराव शेडमाके चौकातून काढून मुख्य रस्त्याने तंबाखूविरोधी नारेबाजी करण्यात आली. दरम्यान, प्राचार्य गजानन लोनबले यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम सांगत मुलांना व पालकांना व्यसनमुक्त राहण्याचे आवाहन केले. एपीआय बाळासाहेब शिंदे यांनी अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन केले. मुक्तिपथ तालुका संघटक केशव चव्हाण यांनी मुलांना व्यसन व व्यसनापासून होणारे दुष्परिणाम सांगत व्यसनमुक्तीची शपथ दिली.

Web Title: Awareness against tobacco use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.