जनमैत्री मेळाव्यातून याेजनांबाबत जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:43 IST2021-02-20T05:43:21+5:302021-02-20T05:43:21+5:30
मेळाव्याचे उद्घाटन गाव पाटील डाेलू गावडे व एटापल्लीचे प्रभारी अधिकारी शीतलकुमार डाेईजड यांच्या हस्ते झाले. यावेळी पाेलीस निरीक्षक रविराज ...

जनमैत्री मेळाव्यातून याेजनांबाबत जागृती
मेळाव्याचे उद्घाटन गाव पाटील डाेलू गावडे व एटापल्लीचे प्रभारी अधिकारी शीतलकुमार डाेईजड यांच्या हस्ते झाले. यावेळी पाेलीस निरीक्षक रविराज कांबळे, संताेष माेरे, सीआरपीएफ १९१ बटालीयनचे एन.एच. ठाकरे उपस्थित हाेते. मेळाव्यात चेतना कलापथनाट्य मंच गडचिराेली यांच्या नेतृत्वात सादरीकरण करून याेजनांबाबत जागृती करण्यात आली.
शीतलकुमार डाेईजड यांनी गावातील नागरिकांना दारू व खर्रा सेवनाचे आराेग्यावर हाेणारे दुष्परिणाम सांगितले, तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. मेळाव्यात उपस्थित असलेल्या नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये ब्लँकेट, जेवणाच्या प्लेट, तसेच विद्यार्थ्यांना वही, पुस्तक, पेन, व्हाॅलीबाॅल, व्हाॅलीबाॅल नेट, बिस्किटे आदी साहित्य एटापल्ली पाेलीस ठाण्याकडून वाटप करण्यात आले. वनविभाग व अन्य विभागातर्फे स्टाॅल लावून शासकीय याेजनांची माहिती देण्यात आली. उपस्थित नागरिकांसाठी पाेलीस ठाण्यातर्फे जेवणाची व्यवस्था करण्यात आली हाेती. सहभाेजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
बाॅक्स .....
माेफत औषधांचे वाटप
आराेग्य विभागाच्या वतीने ताडपल्ली प्राथमिक आराेग्य उपकेंद्रामार्फत मेळाव्यात उपस्थित नागरिकांची माेफत रक्त तपासणी, त्यानंतर विविध आजाराच्या रुग्णांना माेफत औषधाचे वाटप करण्यात आले. रेंगेवाही येथे पहिल्यांदाच जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.