माॅक ड्रीलद्वारे आग व्यवस्थापनाबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:26 IST2021-06-05T04:26:17+5:302021-06-05T04:26:17+5:30
कुरखेडा येथील कपडा दुकानाच्या बाजूला आग लागली असे भासवून पोलीस स्टेशन कुरखेडा व नगरपंचायत कुरखेडा यांना फोनद्वारे कळविण्यात आले. ...

माॅक ड्रीलद्वारे आग व्यवस्थापनाबाबत जनजागृती
कुरखेडा येथील कपडा दुकानाच्या बाजूला आग लागली असे भासवून पोलीस स्टेशन कुरखेडा व नगरपंचायत कुरखेडा यांना फोनद्वारे कळविण्यात आले. त्यानंतर लगेच पाच मिनिटांत नगरपंचायतचे कर्मचारी अग्निशामक वाहन घेऊन तात्काळ हजर झाले. तसेच कुरखेडाचे ठाणेदार सुधाकर देडे हे सुध्दा पोलीस बंदोबस्तासह कपडा बाजारच्या ठिकाणी हजर झाले. तेव्हा आग लागली नसल्याचे चित्र पाहायला मिळाल्यावर सर्वांनी मोकळा श्वास घेतला. सर्वजण आश्चर्यचकित होताच तहसीलदार सोमनाथ माळी यांनी आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडणाऱ्या कौतुक करीत त्यांना नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस आपण नेहमी सतर्क राहून अंमलबजावणी करावी. सोबतच माॅक ड्रील संदर्भात माहिती देऊन प्रत्यक्ष अग्निशामक यंत्र हाताळून दाखविले. यावेळी तहसीलदार सोमनाथ माळी, ठाणेदार सुधाकर देडे, सुरेश उईके, प्रा.विनोद नागपूरकर, नगरपंचायतचे कर्मचारी देवाजी देशमुख व कर्मचारी उपस्थित होते.