आरोग्य प्रबोधिनी संस्था पुरस्काराने सन्मानित

By Admin | Updated: March 19, 2017 01:59 IST2017-03-19T01:59:03+5:302017-03-19T01:59:03+5:30

गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य, युवक कल्याण, व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत संस्था आरोग्य प्रबोधिनी

Awarded by the Health Academy | आरोग्य प्रबोधिनी संस्था पुरस्काराने सन्मानित

आरोग्य प्रबोधिनी संस्था पुरस्काराने सन्मानित

महाराष्ट्र शासनाकडून मुंबईत गौरव
देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य, युवक कल्याण, व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत संस्था आरोग्य प्रबोधिनी देसाईगंजला वर्ष २०१५-१६ चा महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय युवा पुरस्कार समारंभात मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
दीक्षांत सभागृह, मुंबई विद्यापीठ येथे शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते क्रीडा व शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, क्रीडा व युवक सेवा आयुक्त आर. आर. माने यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार संस्थेचे प्रमुख डॉ. सूर्यप्रकाश गभने यांनी नामदार विनोद तावडे यांच्याकडून स्वीकारला. गडचिरोली जिल्ह्यात युवकांमध्ये व्यसनाबद्दल जाणीव जागृती, आरोग्य शिक्षण, वयात येतानाचे जीवन शिक्षण, वैज्ञानिक दृष्टीकोण वाढविणे, मुलगी वाचवा अभियान, दरवर्षी युवक कल्याण कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्य करणे, शाळांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे काम आदींच्या कार्यासाठी आरोग्य प्रबोधिनीला हा पुरस्कार देण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Awarded by the Health Academy