अहेरी तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीवर आविसंची एकहाती सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:44 IST2021-02-17T04:44:33+5:302021-02-17T04:44:33+5:30

आदिवासी विद्यार्थी संघाने सर्वच ग्राम पंचायतीत निवडणूक लढवली हाेती. तालुक्यातील इंदाराम, मेडपली, पेरमिली, येरमनार, कुरूमपली, दामरंचा, कमलापूर, रेपनपली, मांड्रा, ...

Avisan's one sided rule over 16 gram panchayats in Aheri taluka | अहेरी तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीवर आविसंची एकहाती सत्ता

अहेरी तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीवर आविसंची एकहाती सत्ता

आदिवासी विद्यार्थी संघाने सर्वच ग्राम पंचायतीत निवडणूक लढवली हाेती. तालुक्यातील इंदाराम, मेडपली, पेरमिली, येरमनार, कुरूमपली, दामरंचा, कमलापूर, रेपनपली, मांड्रा, गोविंदगाव, देचली, पेठा, वेलगूर, नागेपली, खमनचेरू आदी ग्राम पंचायतींमध्ये आविसंने सत्ता संपादन केली आहे. २९ ग्राम पंचायातपैकी मांड्रा ग्राम पंचायत अविरोध करीत आविसंने झेंडा फडकविला. आविसंचे नेते माजी आमदार दीपक आत्राम, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शनात अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, जि.प. सदस्य अजय नैताम, जि.प.सदस्य सुनीता कुसनाके, अनिताताई आत्राम, पं.स.उपसभापती गीता चालुरकर, माजी पं.स.सभापती तथा विद्यमान पं.स.सदस्य सुरेखा आलाम, शीतल दुर्गे, छाया पोरतेट, शारदा कोरेत, योगीता माेहुर्ले, राकेश तलांडे, इंदारामचे माजी सरपंच गुलाब सोयाम, ताणबोडीचे माजी उपसरपंच अशोक येलमुले, पेरमिलीचे माजी सरपंच प्रमोद आत्राम, जगनाथ मडावी, श्रीनिवास राऊत, संतोष देव्ह्रारे,आविसंचे शहर अध्यक्ष प्रशांत गोडसेलवार, आविसंचे ग्रामीण अध्यक्ष इरशाद शेख, अरफाज शेख, शिवराम पुल्लुरी, सत्यम नीलम, भीमराव मडावी, प्रकाश दुर्गे, लक्ष्मण आत्राम, राकेश सडमेक, प्रमोद कोडापे, गोपाल सुरमवार, सुदीप रंगुवार आदींनी सहकार्य केले. निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच तथा सदस्यांचे पुष्पगुच्छा देऊन स्वागत करणात आले.

Web Title: Avisan's one sided rule over 16 gram panchayats in Aheri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.