अविनाश तागडला ९ पर्यंत पोलीस कोठडी
By Admin | Updated: November 7, 2015 01:18 IST2015-11-07T01:18:01+5:302015-11-07T01:18:01+5:30
पत्नी एसिंथा हिच्या हत्या प्रकरणी अहेरी पोलिसांनी पीएसआय अविनाश तागड याला अटक केली होती.

अविनाश तागडला ९ पर्यंत पोलीस कोठडी
गडचिरोली : पत्नी एसिंथा हिच्या हत्या प्रकरणी अहेरी पोलिसांनी पीएसआय अविनाश तागड याला अटक केली होती. त्याला ६ नोव्हेंबरपर्यंत पीसीआर सुनावला होता. पीसीआरची मुदत संपल्याने आणखी त्याला न्यायालयात हजर केले असता, ९ नोव्हेंबरपर्यंत पीसीआर सुनावला आहे. या प्रकरणात सुनील येमुलवार व विनोद जिलेवार या दोघांनासुद्धा यापूर्वीच ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.