आस्ट्रेलिया देणार आरोग्य प्रशिक्षण
By Admin | Updated: August 1, 2016 01:21 IST2016-08-01T01:21:17+5:302016-08-01T01:21:17+5:30
गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम व अतिदुर्गम भागात आरोग्याच्या समस्या अनेक आहेत.

आस्ट्रेलिया देणार आरोग्य प्रशिक्षण
हेल्थ करिअर फॉऊन्डेशनचा पुढाकार : आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी सकारात्मक पाऊल
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम व अतिदुर्गम भागात आरोग्याच्या समस्या अनेक आहेत. यावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना हेल्थ केअर फॉउंडेशन आस्ट्रेलियाच्या तज्ज्ञामार्फत प्रशिक्षण देऊन आरोग्य यंत्रणेत सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी एक सकारात्मक पाऊल टाकले आहे. या दृष्टीकोणातून शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यात या बाबतचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक व महाराष्ट्र परिचर्या परिषदेचे अध्यक्ष रामलिंगम माळी यांच्या पुढाकारातुन नुकतेच हेल्थ केअर फॉऊंडेशन आॅस्ट्रेलिया या संस्थेच्या भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी पेरीस श्रॉफ व जिल्हा प्रशिक्षण पथक गडचिरोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळवे यांनी आरोग्य विषयक बाबीवर जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्याशी चर्चा केली. त्यात हेल्थ केअर फॉऊंडेशन आॅस्ट्रेलिया या संस्थेतील तज्ज्ञ मंडळीचा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेकरीता कसा फायदा करुन घ्यायचा तसेच जिल्ह्यातील कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना हेल्थ केअर फॉऊंडेशन आॅस्ट्रेलिया येथील तज्ज्ञांच्यामार्फत प्रशिक्षण देऊन आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सकारात्मक पाऊल उचलल्या गेले आहे. हेल्थ केअर फॉऊंडेशन आॅस्ट्रेलिया ही एक नामांकित संस्था असुन अपोलो ग्रुप आॅफ हॉस्पीटल तसेच दक्षिण भारतातील वेगवेगळया नामांकित रुग्णालयांशी व महाराष्ट्र परिचर्या परिषदेशी संलग्न आहे. सदर संस्थेव्दारे जिल्ह्यातील नोंदणीकृत नर्सेसना विशेष लाईफ सपोर्ट तसेच अन्य प्रकारचे आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार असून त्याचा फायदा जनतेला निश्चितच होईल. गडचिरोली सारखा अतिदुर्गम, नक्षल प्रभावीत व अतिसंवेदनशील जिल्हा निवडून समाजाप्रती त्यांच काही देण लागतं याची प्रचीतीच त्यांनी करुन दिली आहे. जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नामुळे सकारात्मक चर्चा होऊन आरोग्य सेवेच्या दृष्टीकोनातून एक पाऊल पुढे आलेले आहे. सदर चमुत हेल्थ केअर फॉऊंडेशन आॅस्ट्रेलियाचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी पेरीस श्राफ, समन्वयक ढोले, सईद जिल्हा प्रशिक्षण पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळवे हजर होते. (जिल्हा प्रतिनिधी)