परिचर सांभाळताे पशुवैद्यकीय दवाखाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:40 IST2021-01-16T04:40:46+5:302021-01-16T04:40:46+5:30
वैरागड येथे प्रथम श्रेणी पशुवैद्यकीय दवाखाना आहे. वैरागड परिसरातील ६ ते ७ गावातील पशुपालक आपली जनावरे येथे उपचारासाठी ...

परिचर सांभाळताे पशुवैद्यकीय दवाखाना
वैरागड येथे प्रथम श्रेणी पशुवैद्यकीय दवाखाना आहे. वैरागड परिसरातील ६ ते ७ गावातील पशुपालक आपली जनावरे येथे उपचारासाठी आणतात. या ठिकणी कार्यरत पशुधन अधिकारी डॉ. गणवीर यांचे अपघाती निधन झाल्यानंतर या दवाखान्यात पशुधन अधिकाऱ्याची नियुक्ती झाली नाही. वैरागड हे आरमोरी तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्येचे गाव असून येथे पशुपालकांची संख्या देखील मोठी आहे. तसेच वैरागड आणि परिसरातील पाटणवाडा, मेंढेबोडी, सुकाळा, मोहझरी करपडा, चामोर्शी माल या गावातील पशुपालक आजारी जनावरे या ठिकाणी उपचारासाठी आणतात. मात्र येथे पशुधन अधिकारी नसल्याने गंभीर आजारी जनावरांवर वेळीच उपचार होऊ शकत नाही. शेती क्षेत्रात यांत्रिकीकरण वाढले असले तरी अनेक शेतकऱ्यांकडे बैलजाेड्या आहेत. तसेच बहुतांश शेतकरी दुग्धव्यवसाय करतात. त्यांच्याकडे पाळीव जनावरे आहेत. या जनावरांना आजार झाल्यास त्यांना पशु दवाखान्यात न्यावे लागते. मात्र त्यांच्यावर तज्ज्ञ डाॅक्टरांअभावी उपचार हाेत नाही.
अनेकदा पशुपालकांना माेठा त्रास सहन करावा लागताे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून येथील पशु वैद्यकीय अधिकाऱ्याचे रिक्त पद लवकर भरावे, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.