दुचाकीस्वारांना लुटण्याचा प्रयत्न फसला
By Admin | Updated: March 22, 2015 00:20 IST2015-03-22T00:20:34+5:302015-03-22T00:20:34+5:30
तलवाडावरून आलापल्लीकडे येत असताना दोन दुचाकीस्वारांना रस्त्याच्या मधोमध दोर बांधून जखमी करून लुटण्याचा प्रयत्न फसल्याची घटना ...

दुचाकीस्वारांना लुटण्याचा प्रयत्न फसला
आलापल्ली : तलवाडावरून आलापल्लीकडे येत असताना दोन दुचाकीस्वारांना रस्त्याच्या मधोमध दोर बांधून जखमी करून लुटण्याचा प्रयत्न फसल्याची घटना गुरूवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास भामरागड-आलापल्ली मार्गावर घडली.
या घटनेत दुचाकी खाली कोसळल्याने मल्लेश तोटावार (४०) व राकेश ऊरेत (२२) हे दोघेजण जखमी झाले. प्राप्त माहितीनुसार मलेश तोट्टावार हे तलवाडा येथील विनोबा आश्रमशाळेत रूग्णवाहिकेवर वाहक पदावर कार्यरत आहेत. राकेश ऊरेत व महेश तोटावार हे दोघे जण गुरूवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास तलवाडावरून आलापल्लीकडे येत होते. अज्ञात इसमांनी मुख्य मार्गावर नाल्याजवळ रस्त्याच्या दुतर्फा नायलॉन दोरी बांधून ठेवली होती. रात्रीची वेळ असल्यामुळे दुचाकीचालक महेश तोटावार यांना ही नायलॉन दोरी दिसली नाही. दरम्यान दोरीमुळे दुचाकीवरील दोघेहीजण खाली कोसळले. मल्लेश तोटावार याच्या गळ्यात बांधून ठेवलेली दोरी अडकली. तेवढ्यात या मार्गाने एक चारचाकी वाहन आले. या वाहनातील नागरिकांनी या दोघाही जखमींना उचलून आजूबाजूला शोधाशोध केली असता या परिसरात कोणीही आढळून आले नाही. या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. (वार्ताहर)