बंदूक व बाॅम्ब गाेळ्यांच्या मदतीने शिकारीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:37 IST2021-03-26T04:37:22+5:302021-03-26T04:37:22+5:30
घटनेची माहिती मिळताच सहायक वन संरक्षक साेनल भडके, वन परिक्षेत्राधिकारी डी. व्ही. कैलुके यांनी घटनास्थळ गाठून विचारपूस केली असता, ...

बंदूक व बाॅम्ब गाेळ्यांच्या मदतीने शिकारीचा प्रयत्न
घटनेची माहिती मिळताच सहायक वन संरक्षक साेनल भडके, वन परिक्षेत्राधिकारी डी. व्ही. कैलुके यांनी घटनास्थळ गाठून विचारपूस केली असता, आराेपींनी जंगलात जाऊन वन्य प्राण्यांच्या शिकारीकरिता भरमार बंदूक व बाॅम्ब गाेळ्यांचा वापर करीत असल्याची कबुली दिली. तसेच कक्ष क्रमांक १७६ मध्ये पाच ठिकाणी बाॅम्ब गाेळे जमिनीवर पेरून ठेवल्याचे प्रत्यक्ष वनाधिकाऱ्यांना दाखविले. त्यावरून आराेपींविराेधात वन गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली आहे. ही कारवाई मुख्य वनसंरक्षक डाॅ. किशाेर मानकर, उपवनसंरक्षक उपवनसंरक्षक डाॅ. कुमारस्वामी शि. र. यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक साेनल भडके, वन परिक्षेत्राधिकारी डी. व्ही. कैलुके, क्षेत्र सहायक प्रमाेद जेणेकर, वनरक्षक भसारकर यांनी केली.