सेना, काँग्रेस नगरसेवकांच्या वाहनताफ्यावर हल्ल्याचा प्रयत्न
By Admin | Updated: December 1, 2015 05:39 IST2015-12-01T05:39:51+5:302015-12-01T05:39:51+5:30
मागील काही दिवसांपासून अज्ञात स्थळी असलेले शिवसेना, काँग्रेस व अपक्ष नगरसेवकांचा ताफा मतदानाकरिता नगर

सेना, काँग्रेस नगरसेवकांच्या वाहनताफ्यावर हल्ल्याचा प्रयत्न
कुरखेडा : मागील काही दिवसांपासून अज्ञात स्थळी असलेले शिवसेना, काँग्रेस व अपक्ष नगरसेवकांचा ताफा मतदानाकरिता नगर पंचायत सभागृहाकडे येत असताना गेवर्धा-कुरखेडा मार्गावर अज्ञात समाजकंटकाच्या एका टोळीने सकाळी १० वाजताच्या सुमारास रस्त्यावर वाहनताफ्याला अडवून शस्त्रासह त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी वाहनाला नुकसान पोहोचविण्यात आले. मात्र नगरसेवक असलेले हे वाहन मागे असल्याने हा प्रकार लक्षात येताच सदर वाहन मागे फिरवत गेवर्धा गावात नेण्यात आले. सुदैवाने नगरसेवक बचावले. त्यानंतर या टोळीने गेवर्धा गावापर्यंत पाठलाग केला. सदर घटनेची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, जि.प.चे उपाध्यक्ष जीवन नाट यांना मिळताच त्यांनी याबाबत कुरखेडाचे ठाणेदार अनिल पाटील यांना माहिती दिली. पोलीस व कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह गेवर्धा गाठून नगरसेवकांना पोलीस सुरक्षेत नगर पंचायत सभागृहात आणण्यात आले. समाजकंठकाची टोळी ही बाहेरगावची असून ते सर्व फरार झाले आहेत. त्यांचा काही शस्त्रसाठा मात्र पोलिसांनी जप्त केला. त्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम राबविण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास कुरखेडाचे ठाणेदार स्वत: अनिल पाटील करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)