व्यक्ती विकासासाठी प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2016 01:23 IST2016-04-08T01:23:01+5:302016-04-08T01:23:01+5:30
जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षातील गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाचे सरकार प्रयत्नशील आहे,

व्यक्ती विकासासाठी प्रयत्नशील
भाजप स्थापना दिन : धानोरात खासदारांचे प्रतिपादन
धानोरा : जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षातील गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाचे सरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी बुधवारी धानोरा येथे भाजपच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात अध्यक्षस्थानाहून केले.
विद्यानगरात पार पडलेल्या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ साळवे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ताराबाई कोटांगले, तालुकाध्यक्ष शशिकांत साळवे, शहर अध्यक्ष गजानन परचाके, अविनाश विश्रोजवार, महामंत्री महादेव गणोरकर, तालुका महिला आघाडी अध्यक्ष लता पुंघाटे, गटनेते विनोद निंबोळकर, कैलास गुंडावार, नगरसेविका लीना साळवे, नगरसेवक सुभाष धाईत, रेखा हलामी, महिला बालकल्याण उपसभापती गीता वालको, दलित आघाडीचे भगवान सहारे, रांगीचे सरपंच जगदीश कन्नाके, जपतलाईच्या उसेंडी, वैशाली म्हशाखेत्री, नरेंद्र भुरसे, संजय कुंडू, ईश्वर पुंघाटे, भाष्कर सोनुले, सुशिला टेकाम, सुखदेव टेकाम उपस्थित होते.
भद्रावती येथे पार पडलेल्या विदर्भस्तरीय क्रीडा स्पर्धेत चार पदके पटकाविल्याबद्दल रेखा हलामी तसेच गीता वालको, सुभाष धाईत, विनोद निंबोरकर, नगरसेविका लीना साळवे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन विजय कुमरे तर आभार महादेव गणोरकर यांनी मानले. यावेळी कार्यकर्ते हजर होते. (तालुका प्रतिनिधी)