बौद्ध भिक्षूवरील हल्ल्याचा निषेध
By Admin | Updated: September 7, 2015 01:34 IST2015-09-07T01:34:16+5:302015-09-07T01:34:16+5:30
चंद्रपूर येथील बौद्ध भिक्षुक आर्यसुत्त यांच्यावर काही समाजकंटकांनी हल्ला केला.

बौद्ध भिक्षूवरील हल्ल्याचा निषेध
तहसीलदारांना निवेदन : कारवाई करण्याची बौद्ध बांधवांची मागणी
कुरखेडा : चंद्रपूर येथील बौद्ध भिक्षुक आर्यसुत्त यांच्यावर काही समाजकंटकांनी हल्ला केला. या हल्ल्याचा निषेध कुरखेडा तालुक्यातील बौद्ध समाजबांधवांनी केला आहे. हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी समाजबांधवांच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
बौद्ध बांधवांवर सातत्याने हल्ले होत आहेत. त्यामुळे शासनाने खबरदारी घेऊन या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, जेणेकरून पुढे दलित, आदिवासी, बहुजन समाजावर हल्ले होणार नाहीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. मोहगाव, वाकडी येथील भंते करूण बुद्ध ज्योती यांच्या नेतृत्त्वात तहसीलदारा निवेदन देताना प्रकाश उके, गितेश जांभुळे, योगश ढवळे, जयमाला सिल्लारे, केवटराम जोगे, प्रदीप जोगे, मंगला सहारे, मच्छिद्र जनबंधू उपस्थित होते.