एटापल्लीचे नायब तहसीलदार सेवेतून कमी

By Admin | Updated: November 3, 2015 00:51 IST2015-11-03T00:51:25+5:302015-11-03T00:51:25+5:30

येथे नायब तहसीलदार पदावर कार्यरत असलेले धरेप्पा रेवनसिद्ध म्हेत्रे यांनी विभागीय परीक्षा विहीत कालावधीत उत्तीर्ण केली नाही.

Atapauli's nb tehsildar is less than the service | एटापल्लीचे नायब तहसीलदार सेवेतून कमी

एटापल्लीचे नायब तहसीलदार सेवेतून कमी

शासनाचे आदेश : परीक्षा उत्तीर्ण केली नाही
एटापल्ली : येथे नायब तहसीलदार पदावर कार्यरत असलेले धरेप्पा रेवनसिद्ध म्हेत्रे यांनी विभागीय परीक्षा विहीत कालावधीत उत्तीर्ण केली नाही. त्यामुळे त्यांना शासनाच्या सेवेतून कमी करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
धरेप्पा म्हेत्रे यांना ८ नोव्हेंबर २००७ रोजी परिविक्षाधीन नायब तहसीलदार या पदावर नागपूर महसूल विभागामध्ये नियुक्ती देण्यात आली होती. त्यानुसार २७ डिसेंबर २००७ रोजी ते रूजू झाले. महाराष्ट्र परिविक्षाधीन नायब तहसीलदार विभागीय परीक्षेच्या नियमानुसार प्रत्येक परिविक्षाधीन नायब तहसीलदाराने दोन वर्षांच्या कालावधीत तीन संधीत विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच शासनाच्या स्वेच्छा निर्णयानुसार एक वर्षाच्या कालावधीत विशेष दोन संधीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मात्र म्हेत्रे यांनी तिन्ही संधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण केली नाही व विशेष परीक्षा सुद्धा एकवेळा दिली नाही. एकवेळा अनुत्तीर्ण झाले. त्यामुळे ते नायब तहसीलदार पदास अपात्र ठरले आहेत.
परिणामी शासनाने त्यांना सेवेतून कमी केले आहे. याबाबतचे पत्र महसूल व वन विभागाचे कार्यासन अधिकारी जिल्हाधिकारी गडचिरोली यांना पाठविले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Atapauli's nb tehsildar is less than the service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.