आरमोरी येथील पंचायत समिती जवळून ताडुरवार नगरातून काळा गोटाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे़ गेल्या पाच-सहा वर्षांपासून रस्त्यावरील डांबर उखडून ठिकठिकाणी खड्डे पडले आहे़त. जवळपास एक ते दीड किमी असलेला रस्ता पूर्णतः खराब झाला आहे. पावसाळ्यात तर नरेंद्र निंबेकर यांच्या घराजवळ मोठमोठे खड्डे पडत असल्याने रस्त्यावर पाणी साचून राहते. त्या खराब पाण्यातून नागरिकांना मार्गक्रमण करावे लागते. मात्र या रस्त्याची दुरवस्था होऊनही नगरपरिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. याबाबत ताडुरवार नगरातील नागरिकांनी रस्त्याची दुरुस्ती करून नव्याने डांबरीकरण करण्याची वेळोवेळी मागणी करूनही याकडे लक्ष देण्यात आले नाही. सदर रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करून डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी देविदास काळबांधे यांनी मुख्याधिकाऱ्यांच्याकडे केली आहे.
ताडुरवार चौक ते काळागोटा मार्गाचे डांबरीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:34 IST