कुथेगाव ते रावनपल्ली रस्त्याचे डांबरीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:34 IST2021-04-12T04:34:45+5:302021-04-12T04:34:45+5:30
नवरगाववरून कुथेगावकडे जाणारा रस्ता पोहार नदी पूल पार करून जाताे. कुथेगावरून रावनपल्लीमार्गे येडानूर, पाविमुरांडा, मुरमूरी असा हा बायपास रस्ता ...

कुथेगाव ते रावनपल्ली रस्त्याचे डांबरीकरण करा
नवरगाववरून कुथेगावकडे जाणारा रस्ता पोहार नदी पूल पार करून जाताे. कुथेगावरून रावनपल्लीमार्गे येडानूर, पाविमुरांडा, मुरमूरी असा हा बायपास रस्ता आहे. रावनपल्ली ते येडानूर रस्त्यावर काही अंतरावर डांबरीकरण झाले आहे. तसेच रावनपल्ली पुलापर्यत डांबरीकरण झाले आहेत. मात्र कुथेगाव ते रावनपल्ली पुलापर्यत ३ किमी अंतर कच्च्या स्वरूपाचे आहे. सदर रस्ता पायवाट असून रस्त्याचे खडीकरण झाले नसल्यामुळे गिट्टी उखडून बाहेर पडली आहे. रस्ता जंगलातून जाणारा असल्याने येथून ये-जा करणाऱ्यांना कमालीचा त्रास हाेत आहे. वाहतूक साेयीची करण्यासाठी कुथेगाव-रावनपल्ली रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी कुथेगावचे सरपंच हरिदास कड्यामी यांनी केली आहे.
चितेकन्हार पुलाची दुरुस्ती रखडली
कुथेगाव तसेच चित्तेकन्हार पुलाची दुरुस्ती झाली नसल्यामुळे कुथेगाव व चित्तेकन्हार येथील नागरिक रावनपल्ली बायपास रस्त्याने प्रवास करतात. तसेच आदिवासी महामंडळाचे धान खरेदी केंद्र पाविमुरांडा येथे असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांना याच मार्गाने धान खरेदी केंद्रांवर जावे लागते. त्यामुळे चितेकन्हार पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.