परिसंवादात उलगडले बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू
By Admin | Updated: February 15, 2016 01:32 IST2016-02-15T01:32:03+5:302016-02-15T01:32:03+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त स्थानिक श्री शंकरराव बेझलवार महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाच्या वतीने

परिसंवादात उलगडले बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू
अहेरीत कार्यक्रम : शंकरराव बेझलवार महाविद्यालयात आयोजन
अहेरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त स्थानिक श्री शंकरराव बेझलवार महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाच्या वतीने गुरूवारी घेण्यात आलेल्या परिसंवादात वक्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलू उलगडत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर होते. प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य सोनोने, अॅड. कुंभारे, प्रा. एम. व्ही. बोरकर, प्रा. डॉ. पी. एल. ढेंगळे, प्रा. एन. एम. मोहुर्ले, प्रा. रवींद्र हजारे उपस्थित होते. देशाची राज्यघटना जोपर्यंत अभ्यासणार नाही, तोपर्यंत बाबासाहेबांच्या कार्याची जाणीव होणार नाही, असे मत प्राचार्य काटकर यांनी मानले. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक शिक्षण तज्ज्ञ’ या विषयावर प्राचार्य सोनोने यांनी मत मांडले. त्यांनी बाबासाहेबांचा शैक्षणिक दृष्टिकोन यावेळी स्पष्ट केला. अॅड. कुंभारे, प्रा. रवींद्र हजारे यांनीही यावेळी मत मांडले. नैना चालुरकर, गणिता दुर्गे, ज्योती दुर्गे, सरिता कुंभारे यांनी गीत सादर केले.
प्रास्ताविक प्रा. पी. व्ही. घोडेस्वार, संचालन प्रा. विनोद बावणे तर आभार कुसुम रत्नम यांनी मानले. यावेळी प्रा. डॉ. दरणे, मेश्राम, गौरकार, जंगमवार, बन्सोड, गजभिये उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)